आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकटक - कर्णधार मिताली राजच्या (नाबाद 103) आपल्या वनडे कारकीर्दीतील चौथ्या शानदार शतकाच्या बळावर भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 6 गड्यांनी मात केली. या विजयासह आयसीसी महिला वर्ल्डकप क्रिकेटमध्ये भारताने सातवे स्थान मिळवले. आठ संघांत पाक टीम आठव्या स्थानी राहिली.
सुपरसिक्सच्या शर्यतीतून बाहेर झाल्यानंतर अब्रू वाचवण्यासाठी भारताला या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक होते. पाकिस्तानी महिला टीमने 50 षटकांत 7 बाद 192 धावा काढल्या. भारताकडून मितालीने 141 चेंडूंचा सामना करताना 1 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने नाबाद 103 धावा काढल्या. मितालीच्या शतकामुळे महिला संघाने 46 व्या षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 195 धावा काढून शानदार विजय मिळवला.
धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. तिस-या षटकात पूनम राऊत 4 धावा काढून बाद झाली. यानंतर मितालीने तिरुष कामिनी (26) सोबत दुस-या विकेटसाठी 43 भागीदारी केली. कामिनीने 44 चेंडूंचा सामना करताना आपल्या खेळीत चार चौकार मारले. मितालीने यानंतर हरमनप्रीत कौर (16) सोबत तिस-या विकेटसाठी 49 धावा आणि रिमा मल्होत्रा (नाबाद 25) पाचव्या विकेटसाठी अभेद्य 87 धावा जोडून भारताला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान 50 षटकांत 7 बाद 192 धावा. (नैन अबिदी 58, निदा दार 68, 3/35 निरंजना, 2/17 झुलन गोस्वामी) पराभूत विरुद्ध भारत 46 षटकांत 4 बाद 195. (मिताली राज नाबाद 103, कामिनी 26, हरमनप्रीत कौर 16, रिमा मल्होत्रा नाबाद 25, 1/19 कानिदा जलिल)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.