आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला विश्‍वचषक : वेस्‍ट इंडिजचा अंतिम सामन्यात प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वेस्ट इंडीजने धक्कादायक कामगिरी करताना पाच वेळेसची चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला रोमांचक लढतीत 8 धावांनी पराभूत केले. या विजयासह विंडीजने आयसीसी महिला वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच फायनलमधील स्थान निश्चित केले आहे. आता दोन्ही संघात पुन्हा 17 फेब्रुवारी रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर फायनलची लढत रंगेल.

वेस्ट इंडीजने 47 षटकांत 164 धावा काढल्या. मात्र, त्यांच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला 48.2 षटकांत अवघ्या 156 धावांतच रोखून सनसनाटी विजय मिळवला. या विजयासह वेस्ट इंडीजची टीम 8 गुणांसह सुपरसिक्स गटात टॉपवर पोहोचली. ऑस्ट्रेलियाच्या टीमचा हा स्पर्धेतील पहिला पराभव ठरला. एका पराभवासह 8 गुणाने मात्र नेट रनरेट कमी असल्याने कांगारूंची टीम गुणतालिकेत दुस-या स्थानी राहिली. वेस्ट इंडीजने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या पाच विकेट अवघ्या 59 धावांतच गारद झाल्या. मात्र, प्लेअर ऑफ द मॅच दियांद्रा डॉटिनने 67 चेंडूंचा सामना करताना दहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 60 धावा काढल्या. सलामीवीर नताशा मॅक्लिनने 26 धावांचे योगदान दिले.

धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची टीम एकवेळ 4 बाद 130 धावा अशा सुस्थितीत होती. मात्र, अचानक त्यांचा डाव 156 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या सहा विकेट अवघ्या 26 धावांत पॅव्हेलियनमध्ये परतल्या. अ‍ॅलेक्स ब्लॅकवेलने 45, जेस कॅमरुनने 39, रेचेल हेंन्सने 21 आणि कर्णधार ज्युडी फिल्डसने 18 धावा काढल्या.

सुपरसिक्सचे इतर निकाल
द. आफ्रिका वि.वि. श्रीलंका, 110 धावांनी.
द. आफ्रिका 8 बाद 227. (सांद्रे फिटज् 64), श्रीलंका 117. (चमारी अटापट्टू 63).