आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women World Cup:for Better Compatation Today India Must Win

महिला विश्‍वचषक : स्पर्धेतील आव्हान टिकून ठेवण्‍यासाठी आज भारताला विजयाची गरज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी भारत व श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. स्पर्धेतील आव्हान राखून ठेवण्याकरिता भारतीय महिला संघासाठी हा सामना ‘करा व मरा’ आहे. स्पर्धेच्या अ गटातून सर्व चार संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. ग्रुप ऑफ डेथच्या या सामन्यात केवळ विजयच नव्हे,तर मोठ्या फरकाने सामना जिंकून सुपरसिक्समध्ये प्रवेश करण्याचे भारतीय महिलांचे लक्ष्य असेल. दुसरा सामना कटक येथे पाकिस्तान महिला संघ व दक्षिण आफ्रिका यांच्यात होत आहे.

अ गटात सर्व संघ एक विजय व एक पराभवासह दोन-दोन गुणांनी बरोबरीत आहेत. नेट रन रेटच्या दृष्टीने वेस्ट इंडीज पहिल्या, भारत दुस-या व इंग्लंड, श्रीलंका अनुक्रमे तिसरा व चौथ्या स्थानावर आहे.
मंगळवारी होणा-या सामन्यात जिंकणारे दोन संघ पुढच्या फेरीत दाखल होतील. मात्र, पराभूत झालेल्या संघाला नेट रन रेटवरून अंतिम सहामध्ये स्थान मिळणार आहे. यासाठी दोन्ही संघांना सामन्यात रन रेटवर विशेष लक्ष ठेवावे लागेल.

भारताचा अ गटातील शेवटचा व निर्णायक मुकाबला श्रीलंकेसोबत होणार आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीज व इंग्लंड यांच्यात सामना होईल. भारताने गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या वेस्ट इंडीजला हरवून स्पर्धेत दमदार सुरुवात केली होती. मात्र, दुस -या सामन्यात भारताला गतविजेत्या इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे श्रीलंकेने पहिल्या सामन्यात इंग्लंडला धूळ चारली होती. मात्र, त्यांना दुस -या सामन्यात विंडीजने पराभूत केले.
संभाव्य संघ

भारत : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), एकता बिस्ट, अमिता दास, झुलन गोस्वामी, सुलक्षणा नाईक, करूना जैन, रिमा मल्होत्रा, मोना मेश्राम, थिरूष कामिनी, रसनारा परवीन, पुनम राऊत, शुभलक्ष्मी शर्मा, गौहर सुलताना.

श्रीलंका : शशिकला श्रीवर्धने (कर्णधार), सांदमली डोलावट्टा, चामरी आटापट्टु, एशानी लोकुसुरीया, एल. मधुसानी, दिलानी मानोदरा, यशोदा मेंडिस, उदेशिका प्रभोधनी, ओशाडी रनसिंघे, इनोका रनवीरा, दीपिका रसगिका, शेरिना रवीकुमार, चामीनी सेनाविरत्ने, प्रसादिनी वीराक्कोडी, श्रीपाली.

भारताकडून दोन शतके
यजमान भारताकडून थिरुष कामिनीने पहिल्या मॅचमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध व हरमनप्रीत कौरने इंग्लंडविरुद्ध शतक ठोकले. या शतकाच्या बळावर भारताने फलंदाजीची क्षमता दाखवून दिली. टीममध्ये मिताली राज व पूनम राऊतला फलंदाजीत आणि गोलंदाजीत झुलन गोस्वामी, निरंजनासमोर चांगली कामगिरी करण्याचे आव्हान आहे.

श्रीलंकादेखील कमी नाही
श्रीलंका टीमची चमारी आटापट्टू, शशिकला श्रीवर्धने आणि यशोदा मेंडिस टॉप ऑ र्डरमध्ये धावा काढण्यास सक्षम आहेत. मधल्या फळीतील कौशल्याने इंग्लंडविरुद्ध शानदार अर्धशतक ठोकले होते. तसेच तळातल्या सिंगुरकाने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून श्रीलंकेला विजय मिळवून दिला.

रनरेटची महत्त्वाची भूमिका
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मोठ्या रनरेटच्या फरकाने विजय मिळवल्यास भारताचे सुपरसिक्समधील स्थान निश्चित होईल. इंग्लंड व वेस्ट इंडीज यांच्यातील सामन्यात पराभूत झालेल्या संघाचा रनरेट चांगला राहिला, तर भारतासाठी हा स्पर्धेतील शेवटचा सामना ठरू शकतो. यासाठी भारताला विजयासाठी मोठी कसरत करावी लागेल. भारताने पहिला विंडीजविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकून गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले.

आजचे सामने
गट संघ स्थळ वेळ
ब ऑ स्ट्रेलिया वि.न्यूझीलंड कटक स.9 वाजेपासून
अ इंग्लंड वि. वेस्ट इंडीज मुंबई स.9 वाजेपासून
ब पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका कटक स. 9 वाजेपासून
अ भारत वि. श्रीलंका मुंबई स. 9 वाजेपासून