आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women's Cricketer Mitali Latest News In Divya Marath

मितालीकडे महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व, स्मृती मनधनाला संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी शुक्रवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. मिताली राज या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. येत्या 23 मार्चपासून बांगलादेशात विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या वेळी भारतीय संघात सांगलीच्या स्मृती मनधनाला संधी देण्यात आली. सोलापूरच्या अनघा देशपांडेला विश्रांती देण्यात आली. नुकत्याच झालेल्या महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत स्मृतीने चमकदार कामगिरी करून वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळवले. मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 24 मार्चला श्रीलंकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. भारतीय संघात हरमनप्रीत कौर, स्मृती मनधना, व्ही. आर. विनिथा, माधुरी मेहता, लतिका कुमारी, करुणा जैन, गौहर सुलताना, सोनिया डबीर, शिखा पांडे, पूनम यादव, श्रावंथी नायडू, एस. शुभलक्ष्मी यांचा समावेश आहे.