आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय महिला हॉकी संघाचा दुसरा विजय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जबरदस्त फॉर्मात असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने पाहुण्या अझरबैजान संघाला दुस-या सामन्यात सोमवारी 2-1 ने पराभूत करून 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. रितू राणी व सबा अंजुम या दोघींनी केलेल्या गोलच्या जोरावर भारतीय संघाने विजय संपादन केला. बुधवारी होणा-या तिस-या सामन्यात भारतीय संघाला मालिका विजयाची संधी आहे.
सलामीच्या शानदार विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. 11 व्या मिनिटाला भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली होती. मात्र, कर्णधार अंसुता लकडा व अनुराधा यांना संधीचे सोने करता आले नाही. 18 व्या मिनिटाला रितू राणीने शानदार खेळी करत संघाला पहिला गोल करून दिला. 32 मिनिटांपर्यंत आघाडीला कायम ठेवणा-या भारतीय संघाला अझरबैजानच्या किम गाएओंगो हिने धक्का दिला.