आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेविरुद्ध भारतीय महिला टीमचा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिलहट - सिलहट - मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा महिलांच्या टी-20 वल्र्डकपमध्ये दमदार विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. भारताला सोमवारी श्रीलंकेविरुद्ध सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंकेने सामन्यात भारताचा 22 धावांनी पराभव केला. भारताचा दुसरा सामना बुधवारी इंग्लंडशी होईल.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 8 बाद 128 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय महिलांनी 106 धावांत गाशा गुंडाळला. शिखा पांडेने भारताकडून सर्वाधिक 22 धावा काढल्या. सलामीवीर स्मृती मनधना (9) व पूनम राऊत (9) झटपट बाद झाल्या. त्यापाठोपाठ भारताची माजी कर्णधार झुलन गोस्वामी 11 धावा काढून तंबूत परतली. सलामीवीर व कर्णधार मिताली राजने 16, हरमनप्रीत कौर 17 धावांचे योगदान दिले. मात्र, त्यांना टीमला विजय मिळवून देता आला नाही. गोलंदाजीत प्रबोधिनी, समृद्धिका आणि रणवीराने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.