आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बु्रसेल्स डायमंड लीगमध्ये बोल्ट, शेली चॅम्पियन तर अमेरिकेच्या अ‍ॅँडरसनला रौप्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बु्रसेल्स- वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन युसेन बोल्टने यंदाच्या सत्रातील शेवटच्या डायमंड लीगमधील 100 मीटर धावण्याची शर्यत जिंकली. त्याने 9.80 सेकंदात शर्यत पूर्ण केली. यासह त्याने 100 शर्यतीच्या किताबावरचे आपले वर्चस्व कायम ठेवले. मागील महिन्यात मॉस्कोत झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये बोल्टने 100, 200 आणि चार गुणे 100मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.

दुसरीकडे लीगमध्ये महिलांच्या 100 मीटर अडथळ्याच्या शर्यतीत अमेरिकेच्या हार्पर नेल्सनने बाजी मारली. तिने 12.48 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाच्या शेली पिअरसनने 12.63 सेकंदासह दुसरे स्थान गाठले. फ्रान्सची महिला खेळाडू सिडीला 12.69 सेकंदासह स्पर्धेत तिसºया स्थानावर समाधान मानावे लागले.

नताशा अव्वल स्थानावर
अमेरिकेच्या नताशा हास्टिंग्सने महिलांच्या 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. तिने 50.36 सेकंदात अंतर पूर्ण केले. बोटस्वानाच्या ए.मोत्सोहोने दुसरा क्रमांक पटकावला. तिने 5041 सेकंदात शर्यत जिंकली. रशियाची महिला खेळाडू अ‍ॅटिनिनो 50.51 सेकंदासह कांस्यपदकाची मानकरी ठरली.

शेलीचे वर्चस्व कायम
जमैकाची शेली अ‍ॅना फ्रेझरने डायमंड लीगमध्ये 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. तिने 10.72 सेकंदात 100 मीटरची शर्यत जिंकली. अमेरिकेच्या अ‍ॅँडरसनला 10.97 सेकंदासह दुसºया स्थानावर समाधान मानावे लागले.1500 मीटरची शर्यत स्वीडनच्या एरेग्वी एवेबाने जिंकली.