Home | Sports | Other Sports | world-badminton

विश्‍व बॅडमिंटन स्‍पर्धाः सायना, ज्वाला, कश्यप विजयी

वृत्तसंस्था | Update - Aug 11, 2011, 02:40 AM IST

ज्वाला गुट्टा आणि दीजूच्या जोडीने मिश्र दुहेरीत दुस-या फेरीत विजय मिळविला.

  • world-badminton

    लंडन - येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू सायना नेहवालने शानदार खेळ करताना महिला एकेरीच्या तिसºया फेरीत धडक दिली आहे. याच वेळी ज्वाला गुट्टा आणि दीजूच्या जोडीने मिश्र दुहेरीत दुस-या फेरीत विजय मिळविला.
    सहावी मानांकित सायनाने आयर्लंडच्या सी. मेगी हिला २१-१०, २१-७ ने पराभूत केले. भारताच्या स्टार खेळाडूने अवघ्या २६ मिनिटांत विजय मिळविला. २१ वर्षीय सायनाला आता तिसºया फेरीत हाँगकाँगच्या पुई येन येप हिच्याशी लढायचे आहे.
    दीजूचे पुनरागमन : दुखापतीतून सावरल्यानंतर वी. दीजूने ज्वाला गुट्टासोबत मिश्र दुहेरीत विजयी सुरुवात केली. १६ मानांकित भारताच्या जोडीने मलेशियाचा जिअ‍ॅन ओंगसुक चिन चुंगला २१-११, २१-१५ ने नमविले.

Trending