विश्व बॅडमिंटन : / विश्व बॅडमिंटन : २८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताच्या पदरी पदक

वृत्तसंस्था

Aug 15,2011 06:20:08 AM IST

विश्व बॅडमिंटन : २८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताच्या पदरी पदक
लंडन. येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय महिला खेळाडू ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने शानदार कामगिरी करताना महिला दुहेरीत कास्यपदकाची कमाई केली आहे. ज्वाला-अश्विनीचे स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न उपांत्य सामन्यातील पराभवासह संपुष्टात आले. मात्र, तरीही या जोडीने तब्बल २८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतासाठी या महत्वाच्या स्पर्धेत पदक जिंकण्याचा पराक्रम केला.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या ज्वाला-अश्विनी जोडीला पाचव्या मानांकित चीनची जोडी टिन क्योंग झाओ युनिई यांच्याकडून उपांत्य सामन्यात जोरदार आव्हान मिळाले. चीनच्या जोडीने संघर्षमय लढतीत भारतीय खेळाडूंवर १४-२१, १६-२१ ने मात केली.
या पराभवानंतरही ज्वाला-अश्विनी जोडीने ती कामगिरी केली, जी गेल्या २८ वर्षांत भारताकडून कोणालाही करता आली नाही. या जोडीने या स्पर्धेत देशासाठी प्रदीर्घ कालावधीनंतर पदक जिंकले.
पदुकोण यांच्यानंतर ज्वाला-अश्विनीने मान उंचावली
या स्पर्धेत यापूर्वी १९८३ मध्ये भारताचे प्रकाश पदूकोण यांनी पुरुषांच्या एकेरीत कास्यपदक जिंकले होते. यानंतर थेट ज्वाला-अश्विनी जोडीचे हे यश संपूर्ण देशाला आनंदीत करून टाकणारे असेच आहे. पदूकोण यांनी डेन्मार्कच्या कोपनहॅगन येथे झालेल्या स्पर्धेत पदक पटकाविण्याचा पराक्रम केला होता.
गेल्या चारही फेरीत जॉर्इंट किलर म्हणून पुढे आलेल्या ज्वाला-अश्विनी जोडीने धमाकेदार कामगिरी केली होती. या जोडीने दुसरी मानांकित जोडी वेन हेसिंग चेंग आणि यु चीन चेंग या चीन-तैयपैच्या जोडीला नमविण्याची कामगिरी केली. यानंतर या जोडीने उपांत्यपूर्व सामन्यात इंडोनेशियाच्या जोडीलाही धूळ चारली होती.
उपांत्य सामन्यात ज्वाला-अश्विनी जोडीने संथ सुरुवात केली. चीनच्या जोडीने ६-२ अशी आघाडी घेऊन आक्रमक सुरुवात केली. यानंतर भारतीय खेळाडूंनी पुनरागमन करताना ८-८ अशी बरोबरी केली. आपल्या पहिल्याच विश्व चॅम्पियनशीपमध्ये खेळणार्या अश्विनीने काही चुका केल्या. याचा लाभ उचलत चीनच्या जोडीने १३-८ अशी आघाडी घेतली. येथूनच इंग्लंडच्या खेळाडूंनी आपली आघाडी कायम ठेवली. दुसºया सेटमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली सुरुवात केली. मात्र, नंतर चीनच्या खेळाडूंनी पुनरागमन करीत सामन्याचे चित्र पालटले.

X
COMMENT