आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Badminton Championship: Saina Enter Pre Final Found

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप : सायनाचा पूर्व उपांत फरीत प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वांग्झू - सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि पी. कश्यप या भारताच्या तीन स्टार खेळाडूंनी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला गटात सिंधूने सनसनाटी विजय मिळवताना दुस-या मानांकित यिहान वांगला पराभूत केले. पुरुष गटात कश्यपने सहाव्या मानांकित युन हूवर धक्कादायक विजय मिळवला. सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार सायना नेहवालला विजयासाठी शर्थीची झुंज द्यावी लागली. मात्र, सुरेख खेळी करून तिने थायलंडच्या पोर्नटिप बुरानाप्रासर्तसुकवर रोमहर्षक विजय मिळवला.


पोर्नटिपला 15 वे आणि सायनाला तिसरे मानांकन मिळाले आहे. सायनाने संघर्षमय लढतीत 18-21, 21-16, 21-14 अशा फरकाने विजय मिळवला. यासह तिने चौथ्यांदा जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व
फेरी गाठली. तिस-या मानांकित सायना नेहवालची तिस-या फेरीतील झुंज यशस्वी ठरली. विजयासाठी तिला 52 मिनिटे कसरत करावी लागली.


सायना, कश्यपची घसरण
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची चमकदार कामगिरी करणा-या सायना नेहवाल आणि पी. कश्यपला क्रमवारीत मात्र, फटका बसला. जाहीर झालेल्या वर्ल्ड बॅडमिंटनच्या क्रमवारीत सायनाची महिला एकेरीत चौथ्या स्थानी व पुरुष एकेरीत कश्यपची 17 व्या स्थानी घसरण झाली.


सिंधूची चीनच्या यिहान वांगवर मात
वर्ल्डकपची तयारी करण्यासाठी मोठ्या स्पर्धेपासून स्वत:ला दूर ठेवणा-या सिंधूने उल्लेखनीय कामगिरी केली. तिने चीनच्या यिहान वांगला अवघ्या 55 मिनिटांत धूळ चारली. दहाव्या मानांकित सिंधूने 21-18, 23-21 ने सामना जिंकला. तिचा हा करिअरमधील वांगविरुद्ध पहिला विजय ठरला. यापूर्वी सुदीरमन चषकात तिला वांगकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, तिने आठ स्मॅशविनर आणि नऊ नेटविनर मारून वांगला पराभवाची परतफेड केली.


कश्यपचा धडाकेबाज विजय
लंडन ऑलिम्पिक क्वार्टर फायनलिस्ट पी. कश्यपने पुरुष एकेरीत सहाव्या मानांकित यून हूला 37 मिनिटांत पराभूत केले. त्याने 21-13, 21-16 अशा फरकाने धडाकेबाज विजय मिळवला. त्याने या सामन्यात सुरेख खेळी करताना 17 स्मॅशविनर मारून विजय मिळवला.
पहिला गेम : सिंधूने पहिल्या गेममध्ये 16-16 ने बरोबरी मिळवून 18-16 अशी आघाडी मिळवली आणि सामना 21-18 ने जिंकला.
दुसरा गेम : वांगने दुस-या गेममध्ये पुनरागमन करताना 20-20 ने बरोबरी साधली होती. त्यानंतर 21-10 ने आघाडीही घेतली होती. मात्र, सिंधूने कौशल्यपूर्ण खेळीने सलग तीन गुणांची कमाई करून दुसरा गेम आपल्या नावे केला. यासह तिने पुढच्या फेरीतील प्रवेशही निश्चित केला. आता तिचा सामना सातव्या मानांकित शिजियान वांगशी होईल.
पहिला गेम : कश्यपने सलग गुणांची कमाई करताना 9-5, 14-7 ने आघाडी घेतली. त्यानंतर त्याने 21-13 ने गेम जिंकला.
दुसरा गेम : कश्यपने 6-7 ने पिछाडीवर असताना सलग 8 गुण मिळवले व 14-7 ने आघाडी घेतली.त्यानंतर त्याने आघाडी घेत दुसरा गेम जिंकला.