आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Badminton Championship Saina Nehawal Thread Round

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सायना तिसऱ्या फेरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपेनहेगन- जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा दुसरा दिवस भारतीय संघासाठी ‘कहीं खुशी, कहीं गम’ असाच ठरला. ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सायना नेहवालने स्पर्धेतील आपल्या मोहिमेला धडाकेबाज विजयाने सुरुवात केली. मात्र, दुसरीकडे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या पी. कश्यपला धक्कादायक पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. सायनाने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत अवघ्या ३१ मिनिटांत विजय मिळवला. सायनाने लढतीत रशियाच्या नतालिया पेर्मिनोवाचा २१-११, २१-९ अशा फरकाने पराभव केला.

श्रीकांतची विजयी सलामी
भारताच्या के. श्रीकांतने पुरुष एकेरीत विजयी सलामी दिली. त्याने लढतीत स्लोव्हानियाच्या इझटोक उत्सोसावर २१-११, ११-२१, २१-१२ अशा फरकाने मात केली.

विष्णू-अपर्णा पराभूत
मिश्र दुहेरीत भारताच्या अरुण विष्णू आणि अपर्णा बालनला दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.जर्मनीच्या मिचेल व बिग्रीटने भारताच्या जोडीला ३३ मिनिटात २१-१४, २१-११ अशा फरकाने पराभूत केले. भारताच्या प्रणव चोप्रा व अक्षय देवालकरने विजय मिळवला.

कश्यपची झुंज अपयशी
राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या पी.कश्यपची जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील १०७ मिनिटांची झुंज अपयशी ठरली. सलामी सामन्यातील धक्कादायक पराभवामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. जर्मनीच्या दिएतेर दोम्केने जागतिक क्रमवारीत २२ व्या स्थानावर असलेल्या कश्यपवर २६-२४, १३-२१, २१-१८ ने सनसनाटी विजय मिळवला.
सायनाची कामगिरी
३१ मिनिटे सामना
०-२ ने नतालिया हरली
२१-११ पहिला गेम
२१-०९ दुसरा गेम