आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Badminton Competition, Sindhu Beat, Saina Out

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत, सिंधू विजयी; सायना बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपेनहेगन- गत स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सिंधूने उपांत्यपूर्व सामन्यातील विघ्न मोठ्या धाडसाने दूर करून रोमहर्षक विजयाची नोंद केली. याशिवाय तिने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत धडक मारली. मात्र, ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सायनाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सिंधूने ८५ मिनिटांत दुसऱ्या मानांकित शिजियान वांगचा पराभव केला. तिने १९-२१, २१-१९, २१-१५ अशा फरकाने सामना जिंकला. पराभवासह चीनच्या खेळाडूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

सायना नेहवालचे जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील आव्हान संपुष्टात आले. तिला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत शुक्रवारी अव्वल मानांकित झुई रुई लीने पराभूत केले. चीनच्या खेळाडूने अवघ्या ४५ मिनिटांत सायनाला धूळ चारली. तिने २१-१५, २१-१५ अशा फरकाने सामना जिंकला. या शानदार विजयासह अव्वल मानांकित खेळाडूने महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. जपानच्या सायका ताकाहाशीला नमवून सायनाने अंतिम आठमध्ये धडक मारली होती.