आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायनामो मॉस्को-मुंबई फायटर्स आज लढणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डायनामो मॉस्कोविरुद्ध पराभवाची परतफेड करण्याच्या उद्देशाने मुंबई फायटर्स उद्या वर्ल्ड सिरीज बॉक्सिंगमधील महत्त्वाच्या लढतीत उतरत आहे.
दोन महिन्यांपूर्वी मॉस्को येथे झालेल्या लढतीत डायनामो मॉस्कोने मुंबई फायटर्सचा 5-0 असा पराभव केला होता. त्या वेळी प्रतिकूल परिस्थितीत सर्व लढती गमावणा-या मुंबई फायटर्सला उद्याच्या लढतीत यजमानपदाच्या वातावरणाचा निश्चितच लाभ होणार आहे.
लढती अशा होतील
गौरव बिदुरी विरुद्ध वल्दीमीर निकिटिन, रात्री 8 नंतर, सिद्धार्थ वर्मा विरुद्ध अदलान अबदुराशिदोव्ह., संजीन पोल व्हर्गोक विरुद्ध मॅक्सिम गझिझॉव्ह, लेनैद चर्नाबएऊविरुद्ध वल्दीमीर शेलेस, युऐन फा ज्युनियर विरुद्ध अर्सलानबेक मकुमुदेव्ह.
गोरेगाव पश्चिम येथील इर्नार्बिट मॉलच्या पार्किंगमधील स्टेडियममध्ये रात्री 8 नंतर या लढती होतील. भारतीय बॉक्सिंगपटूंÞमुळे स्पर्धेला प्रेक्षकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे.