आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Cadet Wrestling : Indian Wrestler Jatin Won Bronz Medal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्व कॅडेट कुस्ती: भारतीय मल्ल जतीनला कांस्यपदकाची कमाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय मल्ल जतीनने सर्बियाच्या केरेंजानीन स्पोर्ट्स सेंटर येथे सुरू असलेल्या विश्व कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक जिंकले. पुरुषांच्या फ्रीस्टाइल स्पर्धेत इतर भारतीयांनी मात्र निराशा केली. जतीनने मात्र 42 किलो वजन गटात रशियाचा मल्ल तेमीरलान एलाइव याला 7-0 ने पराभूत करून कांस्यपदक आपल्या नावे केले. इतर भारतीय मल्लांत रवींद्र (50 किलो), अमित (58 किलो), प्रीतम (69 किलो) यांनी आपापल्या गटात पाचवे स्थान मिळवले. 85 किलो वजन गटात प्रवीणने आठवे स्थान मिळवले. स्पर्धेत भारतीय मल्लांनी 30 गुणांसह तिसरे स्थान मिळवले आहे. रशिया सध्या दोन सुवर्ण आणि दोन कांस्यपदकांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. अझरबैजानचा संघाने गुणतालिकेत 38 गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे.