सोची –
विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत अनेक वेळा चाल खेळण्यासाठी खूप मिनिटे विचार करतात. यादरम्यान खेळाडू डुलकी घेऊ शकतो का, हो. हे खरे आहे, या दोघांच्या आठव्या लढतीदरम्यान कार्लसन काही वेळेसाठी झोपला होता.
कार्लसन आठव्या लढतीच्या सुरुवाती पासूनच थकलेला दिसत होता. लढत अर्ध्यावर आल्यावर तो पेन हातात घेऊन बसल्या बसल्या खुर्चीत झोपला. त्याच्या काळ्या सोंगट्याला धोका जाणवताच तो सावध झाला. त्यानंतर चांगला खेळ करत लढत बरोबरीत राखली. गुरुवारी होणाऱ्या नवव्या लढतीत आनंदला जिंकणे महत्त्वाचे आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, विश्वनाथआनंद आणि कार्लसन यांच्यातील लढतीदरम्यानचे छायाचित्र... अंतिम स्लाइडवर VIDEO