आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2011 Final Ticket Fraud Inquary Starts

2011मधील विश्वचषक सामन्यातील तिकीट विक्री घोटाळ्याच्या चौकशीस प्रारंभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 2011 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्याची सुमारे 400 तिकिटे शिल्लक ठेवण्यात आली होती. प्रत्यक्षात अंतिम सामना हाऊसफुल्ल असतानाही तिकिटे कुणी ठेवली होती, या गोष्टीला नेमका कोण जबाबदार आहे, याची चौकशी करण्याकरिता मुंबई क्रिकेट असोसिएशनने चार सदस्यांची एक समिती नेमली होती. त्या समितीने उद्या बुधवारी, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या कालावधीतील एमसीएचे पदाधिकारी, तिकीट विक्री समिती सदस्य आणि अन्य संबंधितांना चौकशीसाठी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित राहण्यास सांगितले आहे.


यासाठी एमसीएचे रत्नाकर शेट्टी, लालचंद राजपूत, तिकीट विक्री समिती सदस्य श्रीपाद हळबे यांना पाचारण करण्यात आले.