आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - क्रिकेटच्या दुनियेतील दोन दिग्गज खेळाडू मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी हात न लावता कोकाकोला फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण केले. फिफा ट्रॉफीला हात लावण्याचा अधिकार फक्त विश्वविजेता फुटबॉल संघाचा कर्णधार किंवा राष्ट्राध्यक्ष यांना असल्याने सचिन, सौरवला ही ट्रॉफी हातात घेण्याचा आनंद लुटता आला नाही. फिफाच्या या कडक नियमाकडे आयोजकांना दुर्लक्ष करता आले नाही. त्यामुळे उपस्थित चाहत्यांची निराशा झाली.