विश्वचषक उंबरठ्यावर आला असताना भारतीय संघाचे प्रदर्शन पाहिजे तेवढे चांगले होत नाही. भारताने तिरंगी लढत गमावली आहे. खेळाडू दुखापत ग्रस्त झाले आहेत. त्यांना आरामाची गरज आहे. उल्लेखनिय म्हणजे फिटनेस ही समस्या केवळ भारताचीच नव्हे तर जवळपास सर्वच दिग्गज संघांची झाली आहे. प्रत्येक संघामध्ये एकतरी अनफिट खेळाडू आहे.
भारताकडून रोहित शर्मा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा फिटनेसच्या समस्येने ग्रस्त आहेत.
(फोटो - जेम्स फल्कनर, रोहित शर्मा (वर), लसिथ मलिंगा आणि रवींद्र जडेजा (खाली)
मुख्य खेळाडू दुखापतग्रस्त
भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये झालेल्या तिरंगी लढतीमध्ये रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा केवळ एक मॅच खेळू शकले. इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमारला संपूर्ण मालिकेमध्ये बाहेर बसावे लागले.
फिटनेस बनली समस्या
ऑस्ट्रेलियाचा मायकल क्लार्क, जेम्स फल्कनर, शेन वॉटसन अणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा फिटनसेसाठी झुंजत आहेत. भलेही त्यांना सर्वांना विश्वास आहे की, ते सर्व विश्वचषक सुरु होण्यापूर्वी तंदुरुस्त होणार आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा,आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण खेळाडू आणि संपूर्ण लेखाजोगा....