आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2015 मुळे संपूर्ण जग क्रिकेटमय झाले आहे. जिकडे तिकडे क्रिकेटचीच चर्चा आहे. 14 फेब्रुवारी पासून सुरु होणा-या विश्वचषकाची 750,000 तिकीटे विकल्या गेली असल्याचे आयसीसीने सांगितले आहे.
क्रिकेटचा महासंग्राम याची ‘देही याची याची डोळा’ पाहण्यासाठी सर्व क्रिकेट चाहते उत्सुक असतात. दहा लाखाहून अधिक लोक सामने पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत. अजून काही तिकीटे शिल्लक असून ते क्रीडाप्रेमींनी लवकरात लवकर खरेदी करावी असे आवाहन आयसीसीने केले आहे.
यावेळी विश्वचषकातील सर्वच सामने अटीतटीचे होणार असून खुपच संघर्षपूर्ण आणि रंजक होणार असल्याने क्रीडाप्रेमींनी सामना पहाण्याची संधी दवडू नये असे आसीसीचे ची एक्सक्यूटिव डेविड रिचर्ड्सन यांनी सांगितले आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, विश्वचषकाचे वेळापत्रक..