आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015: Afghanistan Crossed 16 Thousand 240 Km Travelling

वर्ल्ड कप 2015: अफगाणिस्तान करणार १६ हजार २४० किमीचा प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्वचषक हा कोणत्याही संघाची पूर्ण परीक्षा घेत असतो. केवळ मैदानावरच नव्हे, तर खेळाडूंना बाहेरही सक्षम राहावे लागेल. दोन सराव व ६ लीग सामन्यादरम्यान होणा-या प्रवासाकडे पहिल्यानंतर असा अंदाज बांधला जाऊ शकतो. यातील सहभागी १४ संघांचा घेण्यात आलेला लेखाजोखा.

ऑस्ट्रेलिया: 15666 किमी.
*अॅडिलेड व मेलबर्नमध्ये २ सराव, त्यानंतर मेलबर्न, ऑकलंड, पर्थ, सिडनी, होबार्ट येथे लीग. २६ तास हवेत, ५५ तास खेळणार.

श्रीलंका: 9080 किमी.
*क्राइस्टचर्च व लिंकन येथे सराव, क्राइस्टचर्च, मेलबर्न, वेलिंग्टन, सिडनी, होबार्टमध्ये लीग सामने, १५ तास हवेत, ५६ तास खेळणार.

पाकिस्तान : 13242 किमी.
*सिडनी व ओव्हलवर सराव. अॅडिलेड, क्राइस्टचर्च, नेपियर, ऑकलंड लीग सामने. २१ दिवसाचा हवाई प्रवास. ५६ तास खेळेल.

इंग्लंड: 8945 किमी.
*सिडनीत सराव, मेलबर्न, वेलिंग्टन, क्राइस्टचर्च, अॅडिलेड ओव्हल, सिडनीत लीग सामने, १५ तास हवेत, ५६ तास मैदानावर.

आकड्यातले अंतर
यूएई: 14392 किमी, आयर्लंड: 12819, बांगलादेश: 12066 किमी झिम्बाव्वे: 10041 किमी द. आफ्रिका: 7261 किमी, स्कॉटलंड: 5766 किमी, न्यूझीलंड: 2528 किमी

एवढे अंतर कशाला
सामन्यांचे ठिकाण हेच या प्रवासाचे मुख्य कारण आहे. जसे, भारत पहिले ३ सामने एकाच ठिकाणी खेळेल. अफगाण यासाठी १३८८ किमीचा प्रवास करेल.