आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015 : All You Need To Know About Every Cricket World Cup Venue

PHOTOS : 14 मैदानांवर होणार विश्वचषकातील सामने, जाणून घ्या या मैदानांबाबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन देश एकत्रितपणे विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करत आहेत. 14 फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात हेग्ले ओव्हल, क्राइस्टचर्च येथे होणार आहे. 44 दिवसांच्या या स्पर्धेतील सोहळ्याचा अंतिम सामना 29 मार्च रोडी मेलबर्न येथे होणार आहे.

भारत - पाकिस्तान ठरणार हाय टेंशन सामना
पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानदरम्यान 15 फेब्रुवारीला होणार सामना स्पर्धेतील सर्वात हाय टेंशन सामना ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. ICC च्या अंदाजानुसार अॅडिलेडमध्ये होणारा हा सामना सुमारे 1.3 अब्ज लोक लाईव्ह पाहतील. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारताची कामगिरी पाकिस्तानच्या वरचढ ठरलेली आहे. भारत अद्याप पाकस्तानच्या विरोधात एकाही सामन्यात पराभूत झालेला नाही. दोन्ही देशाचे खेळाडू सामन्याच्या एक दिवस आधी व्यवस्थित झोपतही नाही, असे दोन्ही देशांच्या खेळाडुंचे म्हणणे आहे.

स्पर्धेची वैशिष्ट्ये...
आयोजक देश : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
44 दिवस चालणार स्पर्धा
14 मैदानांवर होणार सामने
49 सामन्यांतून ठरणार विश्वविजेता संघ
14 संघ विजेतेपदासाठी आपसांत भिडणार
210 खेळाडू विविध देशांचे प्रतिनिधीत्व करणार
ऑस्ट्रेलियात 26 सामने
न्यूझीलंडमध्ये 23 सामने
1st मॅच : अॅडिलेड, 14 फेब्रुवारी, 2015
Last मॅच : मेलबर्न, 29 मार्च, 2015
या मैदानांवर होणार सामने
1. मेलबर्न क्रिकेट स्टेडियम
2. सिडनी क्रिकेट ग्राऊंड
3. अॅडिलेड ओव्हल (अॅडिलेड)
4. डब्ल्यू.ए.सी.ए (पर्थ)
5. ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड (ब्रिस्बेन)
6. बेलेरिवे ओव्हल क्रिकेट ग्राउंड, होबार्ट
7. मानुका ओव्हल (कॅनबेरा)
8. इडन पार्क (ऑकलँड)
9. सिडोन पार्क (हॅमिल्टन)
10. मॅकलेन पार्क (नेपियर)
11. हेग्ले ओव्हल, क्राइस्टचर्च
12. वेस्टपॅक स्टेडियम (वेलिंग्टन)
13. सॅक्सटन ओव्हल (नेल्सन)
14. यूनिवर्सिटी ओव्हल, डुनेडिन
पुढे वाचा, विश्वचषकातील सामने खेळले जाणारी ही सर्व मैदाने का आहेत खास, आणि त्याठिकाणी भारतीय संघाच्या कामगिरीबाबत...