आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015: England Captain Eoin Morgan Accepts The Wero Challenge

PHOTOS: इंग्‍लंडच्‍या कर्णधाराने स्विकारले 'वॅरो चॅलेंज', उतरला मैदानात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेलिंग्टन - विश्‍वचषक 2015 साठी आपल्‍या आगामी सामन्‍यासाठी इंग्‍लंड संघ मंगळवारी न्‍यूझीलंडमधील वेलिंग्‍टन येथे दाखल झाला. तेथे पारंपरिक पध्‍दतीने स्‍थानिक लोकांनी त्‍यांचे स्‍वागत केले. इंग्‍लंडचा कणधार मॉर्गनने देखील पारंपरिक वॅरो खेळाच्‍या चॅलेंजचा स्विकार केला.
(फोटो - वॅरो चॅलेंजमध्‍ये इंग्लिश कर्णधार मॉर्गन)
न्यूजीलंड विरुध्‍द इंग्‍लंड हा सामना 20 फेब्रुवारी रोजी आहे. परंतु, वेलिंग्‍टन पोहोचताच इंग्‍लंडच्‍या खेळाडूंना वॅरो खेळ खेळण्‍याची संधी मिळाली.
काय आहे वॅरो चॅलेंज
न्यूझीलंडमधील एक आदिवासी प्रजाति माओरीचा हा पारंपरिक खेळ आहे. कोणाच्‍या स्‍वागतासाठी माओरी या खेळाचे आयोजन करतात. हे लोक 'ताकी' (शांततेचे प्रतीक) ठेवतात आणि पाहुण्‍यांना उचलण्‍यास सां‍गतात. यावेळी ताकी उचलताना माओरीकडेच लक्ष ठेवावे लागते. त्‍यांच्‍या भाल्‍यासारख्‍या अवजाराचे फटके चूकवावे लागतात.
टीमने केला सराव
या स्वागतानंतर इंग्‍लंड संघाने नेटमध्‍ये सरावही केला. न्‍यूझीलंडने यापूर्वी श्रीलंका आणि स्‍कॉटलँड यांना पराभूत केले आहे. आगामी लढतीमध्‍येही त्‍यांचे विजयी अभियान कायम ठेवण्‍याचा प्रयत्‍न असेल.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, टीम इंडियाचे पारंपरिक पध्‍दतीने कसे झाले स्‍वागत आणि त्‍यांच्‍या सरावाची छायाचित्रे...