आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015 Final Match Will Be India Vs Australia, Said PM Modi

भारत-अाॅस्ट्रेलिया संघात रंगणार विश्‍वचषकातील फायनल, माेदींचा विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न – अागामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये गत विजेती टीम इंडिया अाणि यजमान अाॅस्ट्रेलिया संघ समाेरासमाेर यावे, अशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची इच्छा अाहे. त्यांनी मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर अापली ही इच्छा बाेलून दाखवली.
अाॅस्ट्रेलियाच्या पंतप्रधान टाेनी एबट यांनी या मैदानावर माेदी यांच्यासाठी खास रात्रीच्या भाेजनाचे अायाेजन केले हाेते. या वेळी माेदी यांनी अापल्या भाषणादरम्यान क्रिकेटशी संबंधित अनेक घटनांना उजाळा दिला. या वेळी भारताचे माजी कर्णधार कपिलदेव, सुनील गावसकर अाणि व्हीव्हीएस लक्ष्मणही उपस्थित हाेते.
‘हे मैदान विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा प्रबळ दावेदार अाहे. या अंतिम सामन्यात भारत अाणि अाॅस्ट्रेलिया हे दाेन्ही संघ झंुज देतील, असा मला विश्वास अाहे. या दाेन्ही संघाच्या कामगिरीवर मला पूर्ण विश्वास अाहे. त्यामुळे हे दाेन्ही संघ अापल्या चमकदार खेळीच्या बळावर अंतिम फेरीत प्रवेश करतील,’असेही माेदी या वेळी म्हणाले.
शतक ठाेकल्यासारखे वाटते !
‘अातापर्यंत सिडनीच्या मैदानावर भारताला समाधानकारक यश मिळाले नाही. मात्र, भारताने १९८५ मध्ये याच मैदानावर चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकली हाेती. या वेळी उपस्थित खेळाडूंसाेबत बाेलताना मला या मैदानावर शतक ठाेकल्यासारखे वाटते, तेही मॅकग्रा अाणि ब्रेट लीविरुद्ध,’ असेही माेदी म्हणाले.
या प्रसंगी अाॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बाॅर्डर, स्टीव वाॅ अाणि वेगवान गाेलंदाज ग्लेन मॅकग्रासह अनेक क्रिकेटपटू उपस्थित हाेते. या वेळी माेदी यांनी वर्ल्डकपच्या ट्राॅफीसाेबत छायाचित्रेही काढली.