भारत विरुध्द पाकिस्तान हा सामना म्हटले की, संपूर्ण जगाचे डोळे या सामन्याकडे लागलेले असतात. सामन्यातील चेंडूगणिक चाहत्यांच्या तोंडावरील हाव-भाव बदलत असतात. चाहते हा सामना पाहण्यासाठी किती उत्सुक असतात याची नुकतीच प्रचिती आली आहे. विश्वचषक 2015 मधील भारत - पाक सामन्याची तिकिटे केवळ 12 मिनिटांत संपली आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 फेब्रुवारी रोजी अॅडिलेड रोजी पहिली लढत होणार आहे. हा सामना 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी सुमारे 20 हजार भारतीय नागरिक ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत 53 हजार प्रेक्षकांची आसन क्षमता असलेल्या या मैदानावर होत असलेल्या या सामन्याची तिकीटे केवळ 12 मिनिटांत संपली आहेत. असे दक्षिण ऑस्ट्रेलिया प्रशासनाने सांगितले आहे. उल्लेखनिय म्हणजे भारत विश्वचषकामध्ये पाकिस्तानसोबत एकदाही पराभूत झाला नाही.
53 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या मैदानात 10 ते 15 टक्के तिकीटे
राखीव सोडली तर, सुमारे 45 हजार तिकीटांची विक्री अवघ्या 12 मिनिटांत हातोहात झाली आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, भारतीय वेळेनुसार भारतीय संघाचे विश्वचषकातील वेळापत्रक...