आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015 : India Pakistan One Day Live Score

IND vs PAK : भारताचा पाकवर सहाव्यांदा विजय, भारतभर एकच जयघोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - टीम इंडियाने तीन महिन्यांच्या अपयशाला मागे टाकत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला हरवले. भारताने पाकविरुद्ध विजयाचा षटकार खेचला.
टीम इंडियाने रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानला ७६ धावांनी हरवले. पाकवर हा भारताचा विश्वचषकातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. यासह विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा अजेय राहण्याचा विक्रमही कायम राहिला. भारताचा दुसरा सामना २२ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. पाकिस्तानला २१ फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडीजशी लढायचे आहे.
या सामन्यात सर्वकाही भारतीयांच्या मनासारखे घडले. चांगली सुरुवात मिळाली. विराटने वनडे कारकीर्दीतील (१०७) २२ वे शतक ठोकले. शिखर धवनचा (७३) फॉर्म परत आला आणि मधल्या फळीत सुरेश रैनाही (७४) तळपला. या सर्वांच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर भारताने बाद ३०० चा स्कोअर केला. नंतर मोहंमद शमीने चांगली सुरुवात करून दिली.
प्रत्युत्तरात भारताने १०२, १०३ च्या स्कोअरवर सलग तीन विकेट घेऊन पाकचे कंबरडेच मोडले. पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हकने ७६ धावा ठोकून संघर्ष केला. पाकचा पूर्ण डाव ४७ षटकांत २२४ धावांत अाटोपला.
हा विजय लकी

भारतानेयापूर्वी विश्वचषकात चार वेळा विजयाने सुरुवात केली. चारही वेळा भारत सेमीफायनलमध्ये (२०११, २००३, १९९६, १९८३) पोहोचला. दोन वेळा विजेतेपद पटकावले. या वेळी भारताला हा विजय फायद्याचा ठरू शकतो.

ब्लंडर ऑफ डे
पाक खेळाडूंनी विराट कोहलीला दोन वेळा जीवदान दिले. सामन्याच्या ११ व्या षटकात कोहलीने आफ्रिदीच्या चेंडूवर लाँगऑनवर फटका मारला. यासिर हा झेल घेऊ शकत होता. मात्र, त्याने उशिरा स्टार्ट घेतला. शतक ठोकणारा कोहली त्या वेळी धावांवरच होता. याचाच अर्थ यासिरच्या एका चुकीने पाकच्या हातून सामना खेचला. उमर अकमलनेसुद्धा नंतर कोहलीचा एक झेल सोडला. त्या वेळी कोहली ७६ धावांवर होता.
एका धावेत तीन विकेट
पाकिस्तानने२३.१ षटकांत दोन बाद १०२ धावा काढल्या होत्या. पाक विजयाकडे आगेकूच करीत होता. मात्र, पाक संघ १०३ च्या स्कोअरवर पोहोचेपर्यंत भारताने तीन विकेट घेतल्या. या षटकात उमेश यादवने दुसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर अहमद शहजाद आणि शोएब मकसूदला बाद केले. पुढच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर उमर अकमलला रवींद्र जडेजाने बाद केले. पाच मिनिटांच्या आत पाकचा स्कोअर बाद १०२ वरून बाद १०३ असा झाला.
करिअरचा सर्वात मोठा दिवस : विराट
पाकिस्तानवरील विजयाचा हीरो विराट कोहली म्हणाला, "मला वाटते हा आतापर्यंत माझ्या कारकीर्दीतील सर्वात मोठ्या दिवसांपैकी एक आहे. विश्वचषकात अशी सुरुवात करणे शानदारच आहे. निश्चितपणे पाकनेसुद्धा चांगला संघर्ष केला.
तुम्ही ज्या वेळी देशासाठी चांगले करू इच्छिता, त्या वेळी आपल्याकडून अपेक्षा वाढतात. मला नेहमी अपेक्षा आवडतात.' नेहमीच्या तुलनेत झालेल्या आपल्या संथ खेळीबाबत तो म्हणाला, "संघासाठी त्या वेळी माझी भूमिका एका टोकावर टिकून खेळण्याची होती. असे केल्याने दुसऱ्या टोकाने मोठे फटके मारता येणार होते. सुरुवातीला शिखरने आणि नंतर रैनाने शानदार फलंदाजी करून मला सहकार्य केले. आम्ही याच लयीने पूर्ण स्पर्धेत कामगिरी करू, अशी आशा आहे.
फलंदाजांवर धोनी समाधानी

भारतीयकर्णधार महेंद्रसिंग धोनीने विजयानंतर आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, "ही कामगिरी शानदार होती. मी आमच्या फलंदाजांच्या कामगिरीने समाधानी आहे. चाहत्यांचेसुद्धा आभार. त्यांनी मोठ्या संख्येने येथे येऊन आम्हाला पाठिंबा दिला.
झटपटविकेट गेल्याने नुकसान : मिसबाह
पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हक म्हणाला, "भारतीय खेळाडू खूप चांगले खेळले. त्यांनी मोठा स्कोअर केला. नंतर त्यांनी शानदार गोलंदाजीसुद्धा केली. धावांचा पाठलाग करताना आम्ही झटपट विकेट गमावल्या. हेच आमच्यासाठी घातक ठरले.'
पुढील स्लाइड्सवर पाहा, सामन्याचे PHOTO