अॅडीलेड – क्रिकेट विश्वचषकाची लाट सराव सामन्यापासूनच पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगात सध्या क्रिकेटचे वारे वाहू लागले आहेत. रविवारी भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान होत असलेल्या सराव सामन्याची सर्व तिकीटे विकल्या गेली असून अजूनही क्रीडाप्रेमींची मागणी कायम आहे.
‘रविवारी अॅडीलेडमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत दरम्यान होणा-या सराव सामन्याची आणि सिडनीच्या ब्लॅकटाउन इंटरनॅशनल स्पोर्ट्सपार्कवर होत असलेल्या पाकिस्तान आणि बांग्लादेश दरम्यानच्या सामन्याची सर्व तिकीटे विकल्या गेले अाहेत. क्रीडाप्रेमींना मैदानावर विनातिकीट दिल्या जाणार नाही. असे आयसीसीच्या ऑफिशिअल संकेतस्थळावर म्हटले आहे.
विश्वचषकापूर्वी 14 सराव सामने होणार आहेत. हे सामने 8 फेब्रुवारी पासून 13 फेब्रुवारी पर्यंत अॅडिलेड, ख्राइस्टचर्च, मेलबर्न आणि सिडनी मैदानावर खेळल्या जाणार आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, विश्वचषक 2015 चे वेळापत्रक