मुंबई - विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी
आपापल्या देशांच्या संघांना पाठिंबा देण्यासाठी येणा-या क्रिकेट रसिकांच्या सोयीसाठी आयसीसीने बाद फेरीच्या सामन्यांची ठिकाणे संघांच्या पात्रतेनुसार निश्चित केली आहेत.ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन यजमानांचा समावेश ‘अ’ गटात आहे. ‘अ’ गटातून बाद फेरीसाठी ऑस्ट्रेलियन संघ पात्र ठरल्यास २० मार्च रोजी होणा-या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अॅडिलेड येथे खेळेल.
न्यूझीलंडने बाद फेरी गाठली, तर त्यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना २१ मार्चला वेलिंग्टन येथे होईल. ‘अ’ गटातील विश्वक्रमवारीत पुढे असलेले दोन संघ आहेत- श्रीलंका आणि इंग्लंड. श्रीलंकेने अंतिम ८ जणांत प्रवेश मिळविला, तर त्यांचा उपान्त्यपूर्व फेरीचा सामना १८ मार्चला सिडनीला होईल. इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरी गाठल्यास त्यांचा तो सामना १९ मार्चला मेलबर्न येथे होईल. निश्चित करण्यात आलेला संघ बाद फेरीसाठी पात्र ठरला नाही, तर त्याच्या जागी पात्र संघास त्या ठिकाणी खेळण्याचा मान देण्यात येईल. ‘ब’ गटातून पात्र होणारे ४ संघ ‘अ’ गटातील प्रतिस्पर्ध्यांनी जी ठिकाणे दिली आहेत.