आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Cup 2015 : Meet To Indian Bowller Mohammed Shami

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FACTS: कधीकाळी बिर्याणीसाठी विकेट मिळवायचा वेगवान गोलंदाज शमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय गोलंदाजीतील प्रमुख अस्‍त्र मोहम्‍मद शमी भारतासाठी भूषवह कामगिरी करत आहे. भारतीय संघात स्‍थान मिळविणे हे नक्कीच सोपे नाही. परंतु अथक परिश्रम आणि जिद्दीच्‍या जोरावर मोहम्‍मद शमीने भारतीय संघात स्‍थान मिळविले आहे. भारताच्‍या प्रमुख गोलंदाजांपैकी तो एक आहे.
दिल्‍ली आणि उत्‍तर प्रदेश राष्‍ट्रीय महामार्गावर 'साहसपुर अलीनगर' एक छोटेसे गाव आहे. मुरादाबादहून या गावाला जाण्‍यासाठी अर्धा तास लागतो. या छोट्या गावातून येवून मोहम्‍मद शमीने आपला अटकेपार झेंडा लावला आहे.
(फोटो-मोहम्मद शमी आणि विराट कोहली)
Divyamarathi.com आपणास शमी विषयी काही महत्वपूर्ण FACTS सांगत आहे.
बिर्याणीसाठी मिळवायाचा विकेट
मोहम्मद शमीची आवडती डीश बिर्याणी आहे. ‘शमीने विकेट मिळविली तर शमीला दोन प्‍लेट बिर्याणी अशी शर्यत लागलेली असायची. आणि बिर्याणीप्रेमापोटी शमी विकेट घ्‍यायचा. असा खुलासा कोलकाता नाइटराइडर्सचे मेंटर आणि शमीचा मित्र देवव्रत दासने सांगितला आहे.
भावाला भेट दिली लग्‍झरी कार
मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलिया दो-यावर जाण्‍यापूर्वी मोठा भाऊ हजीब अहमदला लग्‍झरी कार भेट दिली. त्‍याच्‍या भावाने गाडीचा नंबर '1100' हो निवडला आहे. कारण शमी 11 नंबरची जर्सी परिधान करतो.
पुढील स्‍लाइडवर वाचा, मोहम्मद शमीच्‍या जीवनाशी निगडीत काही रंजक FACTS