आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015 : Missing Bowlers And Troubles Chasing

FACTS: जाणून घ्‍या, विश्‍वचषकातील टॉप 8 संघांचे बॉलिंग प्रदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेट विश्‍वचषक -2015 शनिवारपासून सुरु होणार आहे. विश्‍वचषकातील सर्वांत अटीतटीचा सामना भारत-पाक 15 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. भारतीय संघ पा‍कवर विजयी अभियान कायम ठेवण्‍यास उत्‍सुक असेल तर पाकिस्‍तान संघ भारताविरुध्‍द पहिला-वहिला विजय मिळविण्‍यासाठी तत्‍पर असेल.
(फोटो - शाहिद आफ्रिदी (डावीकडे) आणि कर्णधार मिस्बाह उल हक)
बॉलिंगला नाही धार
2013 पासून आतापर्यंत पाकिस्‍तानच्‍या बॉलर्सची बॉलिंग सरासरी 35.2 टक्‍के आहे. जी विश्‍वचषकातील टॉप 8 संघातील अगदी तळाची सरासरी आहे. पाकिस्‍तानी गोलंदाजांचा स्‍ट्राईक रेटसुध्‍दा कमी आहे. तर इकोनॉमी रेट 5.3 टक्‍के आहे. म्‍हणजे इतर तुलनेत बरा आहे.
टॉप 8 टीम बॉलिंग अॅव्‍हरेज
1. दक्षिण आफ्रिका 25.84
2.न्‍यूझीलंड 29.54
3. ऑस्ट्रेलिया 29.99
4. भारत 32.17
5.इंग्‍लंड 32.33
6. श्रीलंका 33.20
7. वेस्टइंडीज 34.81
8. पाकिस्तान 35.78
विश्‍वचषकात चांगली कामगिरी नाही करु शकला पाकिस्तान
विश्‍वचषकात पाकिस्तानचे प्रदर्शन एवढे चांगले राहिले नाही. धावांचा यशस्‍वी पाठलाग पा‍किस्‍तान टीम करु शकली नाही. विश्‍वचषकात खेळल्‍या गेलेल्‍या 64 सामन्‍यात पाकिस्तानने 36 सामन्‍यात विजय मिळविला. पाकिस्तानपूर्वी ऑस्ट्रेलिया (55),न्‍यूझीलंड (40),इंग्‍लंड (39), भारत (39) आणि वेस्टइंडीज (38) आहे.
* विश्‍वचषकात पाकिस्‍तान भारताविरुध्‍द एकही सामना जिंकू शकला नाही.
* पाकिस्तानने श्रीलंकेविरुध्‍द सातही सामने जिंकले.
* दक्षिण आफ्रिकेविरुध्‍द पाकिस्तान एकही सामना जिंकू शकला नाही.
'घातक' आफ्रिदी
2013 पासून आतापर्यंत तीने वेळा शाहिद आफ्रिदीने 200 च्‍या स्ट्राइक रेटने 50 हून अधिक धावा बनविल्‍या. आपलया करिअरमध्‍ये आफ्रिदीने हा कारनामा 12 वेळा केला आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, भारताविरुध्‍द पाकिस्‍तानचे काही रंजक आकडे..