आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015: New Zealand Vs Sri Lank, Lanka Defeated By 98 Runs

न्यूझीलंडचा श्रीलंकेला ९८ धावांनी दणका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्राइस्टचर्च - फलंदाज आणि गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर न्यूझीलंडने विश्वचषकात विजयाने आपल्या अभियानाला सुरुवात केली. न्यूझीलंडने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला ९८ धावांनी दणका दिला. यजमान किवीज संघाने प्रथम फलंदाजी करताना ३३२ धावांचा विशाल स्कोअर केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव ४६.१ षटकांत २३३ धावांत आटोपला.

यजमान संघ प्रथमच चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने विश्वचषकात खेळत आहे. त्यांनी आक्रमक शैलीत सुरुवात केली. पहिल्या ७५ चेंडूंत त्यांनी १०० धावा ठोकल्या. कर्णधार ब्रेंडन मॅक्लुमने (६५) लंकेवरील आक्रमणाचे नेतृत्व केले. त्याने मलिंगाच्या चौथ्या आणि आठव्या षटकात चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २३ धावा वसूल केल्या. उर्वरित फलंदाजांनी मॅक्लुमच्या पावलावर पाऊल ठेवले.

कोरी अँडरसन (७५), केन विल्यम्सन (५७) आणि मार्टिन गुप्तिल (४९) यांनी शानदार फलंदाजी करून स्कोअर ३०० च्या पुढे पोहोचवला. अँडरसनने आक्रमक खेळी करून लंकेला घाम फोडला.

श्रीलंकेचे दिग्गज अपयशी
धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सलामी जोडी थिरिमाने (६५) आणि तिलकरत्ने दिलशान (२४) यांनी १३ षटकांत ६७ धावा ठोकून चांगली सुरुवात केली. मात्र, यानंतर महेला जयवर्धने शून्यावरच व्हिट्टोरीचा बळी ठरला. संगकाराही (३९) मोठी खेळी करू शकला नाही. कर्णधार अँजेलो मॅथ्यूजही (४६) अधिक संघर्ष करू शकला नाही. अँडरसन, व्हिट्टोरी, टीम साऊथी, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
पुढे वाचा, महागडी हॅट्ट्रीक