आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015 Opening Ceremony: Ms Dhoni And Misbahul Haque Meet

WC: 'सख्‍खे शेजारी, कट्टर वैरी' जेव्‍हा एकमेकांना भेटतात... पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्‍वचषक -2015 चा रंगारंग कार्यक्रमात प्रारंभ झाला आहे. 14 ही संघाचे कर्णधार समारंभात सहभागी झाले होते. त्‍यामधील रंजक बाब म्‍हणजे, भारत-पाकचे कर्णधार दोघेही सोबत आले. त्‍यांनी सोबत फोटोही घेतले.
पारंपरिक प्रतिस्‍पर्धी म्‍हणून ओळल्‍या जाणा-या भारत पाकिस्‍तानच्‍या कर्णधारांकडे सर्वांच्‍या नजरा लागल्‍या होत्‍या. तर कित्‍येक तरुणांची आणि उपस्थितांची या कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि कर्णधार मिस्‍बाह उल हक यांच्‍यासोबत फोटो घेण्‍याची धडपड सुरु होती. एवढेच नव्‍हे तर आयसीसीने या दोन खेळाडूंचा एकत्र फोटो आपल्‍या ट्विटर अकाउंटवर पोस्‍ट केला आहे. सर्व खेळाडू आपापल्‍या देशाचे ब्‍लेझर परिधान करुन उद्घाटन समारंभास उपस्थित होते.
15 तारखेला भारत v/s पाक
रविवारी सकाळी 9 वाजेपासून भारत-पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. त्याची सर्व तिकिटे विकली गेलेली आहेत. भारताने विश्वचषकात आजवर पाकिस्तानविरुद्ध एकदाही पराभव पत्करलेला नाही. या दाेन देशातील सामना पाहण्‍यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेले असते.
(फोटो- भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि पाकिस्तानचा कर्णधार मिस्‍बाह उल हक (डावीकडे)
पुढील स्‍लाइडवर पाहा,कर्णधार धोनीसोबत फोटो घेण्‍यासाठी क्रेझी झालेले क्रीडाप्रेमी..