आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्‍वचषक उद्घाटनावेळी \'धतिंग नाच\'वर माही खुश; इंग्लिश परीने मिळविल्‍या टाळ्या, VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न/ख्राइस्टचर्च - क्रिकेटमधील 'रणसंग्राम' अर्थात विश्‍वचषकाचे न्‍यूझीलंडमध्‍ये थाटात उद्घाटन सुरु झाले आहे. ख्राइस्‍टचर्चमध्‍ये दुपारी 1:30 पासून समारंभाची सुरुवात झाली आहे. न्‍यूझीलंड संघाचा कर्णधार ब्रँडन मॅक्‍यूलमने देशवासियांना संबोधीत केले. त्‍यानंतर प्रसिध्‍द संगीतकार सोल 3 मियोच्‍या शानदार सादरीकरणाने उद्घाटन समारंभाला सुरुवात झाली आहे.
भारतीय कलाकारांचे 'धतिंग नाच'
विश्‍वचषकात भारतीय कलाकारांनी शाहिद कपूरच्‍या गाजलेल्‍या 'धतिंग नाच' या गाण्‍यावर भन्‍नाट सादरीकरण केले. या गाण्‍यामुळे स्‍टेडिअमध्‍ये अक्षरक्ष: जल्‍लोषाला उधाण आले. त्‍यानंतर इंग्‍लंडच्‍या कलाकारांनी केलेेल्‍या नृत्‍यविष्‍काराने प्रेषकांची मने जिंकली.
यंदा दोन देशाकडे संयुक्तरीत्या वर्ल्डकपचे यजमानपद असल्यामुळे उद‌्घाटन सोहळेही दोन ठिकाणी होत आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार पहिला सोहळा न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमध्ये दुपारी दोन वाजता सुरू झाले आहे. तर सायंकाळी पाच वाजता ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये दुसरा सोहळा संपन्न होईल.
सर्व तिकीटांची विक्री
उद्धाटन समारंभाचे सर्व तिकीटे विकल्‍या गेले असल्‍याचे आयसीसीच्‍या प्रवत्‍यांनी सांगितले आहे. या समारंभात 14 देशांची विविधता दाखविली जाणार आहे. विश्‍वचषक जिंकणा-या संघास 24.7 कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे.
फ्लेमिंगच्‍या अभिनयाने जिंकले
न्‍यूझीलंडचा माजी कर्णधार स्‍टीफन फ्लेमिंगने उद्धाटन समारंभात उत्‍कृष्‍ठ अभिनय केला. त्‍याने त्‍याच्‍या अभिनयाने सर्वांना खिळवून ठेवले. फ्लेमिंगने स्‍टेजवर लहान कलाकारांसोबत क्रिकेट खेळले. त्‍यांना क्रिकेटविषयी काही मार्गदर्शनही केले.उद्घाटन समारंभात न्यूझीलंडमधील संगीत, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रसिध्‍द कलाकारांनी आपली कला सादर केली.
न्‍यूझीलंडमध्‍ये जबरदस्‍त उत्‍साह - क्रीडामंत्री
न्‍यूझीलंडमध्‍ये क्रिकेटप्रेमी मोठ्यासंख्‍येने आहेत. चार लाख तिकीटांपैकी तीन लाख तिकीटे हातोहात विकली गेली आहेत. असे न्‍यूझीलंडेचे क्रीडामंत्री जोनाथन कोलेमन यांनी सांगितले.
रग्‍बीहून भारी क्रिकेटचा रोमांच
या आठवड्यात रग्‍बीच्‍ो सुपर 15 सामने होणार आहेत. परंतु सर्व टीव्‍ही चॅनल्‍स आणि माध्‍यमांमध्‍ये फक्‍त क्रिकेट विश्‍वचषकाचीच चर्चा सुरु आहे.
मेलबर्न : अडीच तास चालणार उद्घाटन कार्यक्रम
मेलबर्नमध्‍ये तब्‍बल अडीच तास रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे आकर्षण म्‍हणजे 'सिडनीची मेइर म्यूझिक बाउल' टीम आहे. या टीमधील गायक, नर्तक आणि आर्टिस्‍ट विश्‍वचषकात समाविष्‍ट असलेल्‍या 14 देशांची संस्‍कृती सादर करणार आहेत.
90,000 लोकांची उपस्थिती
माध्‍यमांनी दिलेल्‍या हवाल्‍यानुसार, विश्‍वचषक उद्घाटन कार्यक्रमानंतर 14 फेब्रुवारी रोजी होणात्‍या ऑस्‍ट्रेलिया विरुध्‍द इंग्‍लंड या पहिल्‍या सामन्‍यामध्‍ये 90,000 प्रेषक उपस्थित राहणार आहेत.
4 देशांचे कर्णधार न्‍यूझीलंडमध्‍ये आणि 10 देशांचे कर्णधार ऑस्‍ट्रेलियामध्‍ये
न्यूझीलंड : यजमान न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रीका, झिम्‍बॉब्वे
ऑस्ट्रेलिया : यजमान ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, अफगानिस्तान, यूएई, इंग्‍लंड, वेस्ट इंडीज, हॉंगकॉंग, आयरलँड, स्कॉटलँड
पहिला सामना न्‍यूझीलंड-श्रीलंकेदरम्‍यान
विश्‍वचषकातील मुख्‍य सामने शनिवार पासून सुरु होणार आहेत. पहिला सामना न्‍यूझीलंड विरुध्‍द श्रीलंका यांच्‍यामध्‍ये ख्राईस्‍टचर्च येथे खेळल्‍या जाणार आहे. दुसरा सामना ऑस्ट्रेलिया विरुध्‍द इंग्‍लंड यांच्‍यादरम्‍यान मेलबर्न येथे खेळल्‍या जाणार आहे.
15 तारखेला भारत v/s पाक
रविवारी सकाळी ९ वाजेपासून भारत-पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. त्याची सर्व तिकिटे विकली गेलेली आहेत. भारताने विश्वचषकात आजवर पाकिस्तानविरुद्ध एकदाही पराभव पत्करलेला नाही.
चॅम्पियनला मिळणार 24.7, रनर अपला मिळणार 10.3 कोटी रुपये
* 24.7 कोटी रुपये- चॅम्पियन ठरणा-या देशासाठी
* 10.3 कोटी रुपये - उपविजेत्‍या संघास
* 3.6 कोटी रुपये- सेमीफायनलमध्‍ये हरणा-या संघास
* 1.8 कोटी रुपये -सेमीफायनलमध्‍ये हरणा-या संघास
* 27 लाख रुपये- ग्रुप स्तरावर प्रत्‍येक सामना जिंकणा-या संघास
* 22 लाख रुपये - ग्रुप स्तरातून बाहेर पडणा-या संघास
यजमानी FACTS
* 14 टीम
* 14 मैदान
* 44 दिन
* 49 मॅच
* 23 वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया-न्‍यूझीलंड यावेळी यजमानपद सांभाळत आहे. यापूर्वी 1992 या दोन्‍ही देशांनी विश्‍वचषकाचे यजमानपद निभावले होते.
तीन मॅच जिंकल्‍यास अंतीम आठमध्‍ये पोहोचू शकतो भारत
विश्‍वचषकापूर्वी ऑस्‍ट्रेलियात भारत पराभूत झाला आहे. मात्र, धोनी ब्रिगेडने 2011 चा विश्‍वचषक भारताला जिंकून दिला होता. तेव्‍हापासून भारताने 99 सामन्‍यांपैकी सर्वांधीक 57 सामन्‍यांवर विजयी मोहर उमटविली आहे. 2013 मध्‍ये टीम इंडियाने इंग्‍लंडच्‍या धरतीवर चॅम्पियन ट्रॉफीसुध्‍दा मिळविली आहे. त्‍यामुळे भारतास विश्‍वचषक 2015 चे प्रबळ दावेदार समजले जात आहे.
या देशांविरुध्‍द असतील भारताचे सामने
* 15 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान
* 22 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रीका
* 28 फेब्रुवारी रोजी यूएई
* 06 मार्च रोजी वेस्ट इंडीज
* 10 मार्च रोजी आयरलँड
* 14 मार्च रोजी झिम्‍बॉंब्वे
* यूएई, आयरलँड आणि झिम्‍बॉंब्वे हरवून भारत क्‍वॉर्टर फायनलपर्यंत पोहोचू शकतो.
या देशांपैकी एका संघाशी होणार भारतची लढत
* ऑस्ट्रेलिया : घरच्‍या मैदानावर चांगले प्रदर्शन करु शकतो. शिवाय चार वेळा वर्ल्‍ड चॅम्पियन आहे. आणि फॉर्ममध्‍येही आहे.
* श्रीलंका : गेल्‍या वेळी भारतासोबत अंतीम लढतीमध्‍ये पराभूत झाला. बदल्‍याच्‍या आगीने खेळणार.
* इंग्‍लंड : आतापर्यंत एकदाही विश्‍वचषक जिंकू शकला नाही. तीन वेळा अंतीम लढतीत पोहोचला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, उद्घाटन समारंभाची भन्‍नाट छायाचित्रे... तिस-या स्‍लाइडवर पाहा VIDEO