आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Cup 2015: Players Opinion About India Vs Pakistan Match In World Cup

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Ind vs Pak रोमांच : सचिनने सांगितली आपबीती, खेळाडूंची उडते झोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 फेब्रुवारी रोजी भारत –पाक विश्‍वचषकातील पहिला सामना खेळणार आहेत. भारत-पाक सामना म्‍हटले की, मैदानावर युध्‍दसदृश्‍य परिस्थिती असते. दोन्‍ही देशातील खेळाडू प्राणाची बाजी लावून खेळत असतात. हा सामना प्रेक्षक डोळ्यात प्राण आणून बघत असतात. भारत-पाक सामन्‍याचा रोमांच सचिने आपल्‍या आत्‍मचरित्रात नमुद केला आहे.
‘प्लेयिंग इट माइ वे' मध्‍ये सांगितली आपबीती
2003 च्‍या विश्‍वचषकामध्‍ये सचिन तेंडुलकरने पाकिस्‍तानविरुध्‍द 75 चेंडूत 98 धावांची विस्‍फोटक खेळी खेळली होती. त्‍यावेळी सचिनने पाकिस्‍तानची ‘रावळपिंडी एक्‍सप्रेस’ शोएब अख्‍तरची चांगलीच धुलाई केली होती. सचिनने या खेळीला सर्वोत्‍तम खेळी असे म्‍हटले आहे. सचिन पुढे म्‍हणाला की, आपला संघ हरावा असे कोणत्‍याच प्रेक्षकाला वाटत नाही. याचाच दबाव खेळाडूंवर येतो. भारत- पाक सामन्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी दोन्‍ही देशातील खेळाडूंना झोप लागत नाही.
सचिनला मिळाले चार जीवनदान अािण हरले पाकिस्तान
2011 च्‍या विश्‍वचषकाविषयी सचिनने आपल्‍या आत्‍मचरित्रात लिहिले की, सामना सुरु होण्‍यापूर्वी एक तासापासून संपूर्ण मैदानात जल्‍लोष सुरु होता. त्‍यामुळे सर्व खेळाडू दबावात आले होते. त्‍यामुळेच सचिनला चार जीवदान मिळाले होते. त्‍यावेळी सचिनने 85 धावा केल्‍या होत्‍या. पाकिस्‍तानी खेळाडुंच्‍या चेह-यावर दबाव स्‍पष्‍ट दिसत होता.
विश्‍वचषकात पाकिस्तान विरुध्‍द सचिनची खेळी
वर्ल्ड कप - स्कोर (चेंडु) - ग्राउंड
* 1992 - 54 (62)- सिडनी
* 1996 - 31 (59) – बंगळूर
* 1999 - 45 (65) - मॅनचेस्टर
* 2003 - 98 (75) - सेंचुरियन
* 2011 - 85 (115) - मोहाली
पुढील स्‍लाइडवर वाचा, भारत-पाक सामन्‍यासंबधी हरभजन सिंग , शोएब अख्तर यांचे मत....