आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015: Ravi Shastris Selection As A Referee

सहायक म्हणून भारताचे पंच एस. रवी यांची वर्ल्डकपसाठी निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 2015 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची सलामी श्रीलंका-न्यूझीलंड यांच्यातील लढतीने होत अाहे. १४ फेब्रुवारी हाेणा-या या सामन्यावर नाचजेल लाँग व मराईस इरॅस्मस या दोन मुख्य पंचांची देखरेख असेल. या वेळी त्यांचा सहायक म्हणून भारताच्या एस. रवी यांची तिसरा पंच म्हणून आयसीसीने नियुक्ती केली आहे. नुकतीच आयसीसीने विश्वचषकासाठीच्या पंचांच्या नावाची घोषणा केली.

विश्वचषक स्पर्धेच्या वॉर्मअप सामन्यांसाठी व विश्वचषकाच्या साखळी सामन्यांवरही भारताच्या रवी यांची नियुक्ती आयसीसीने केली आहे. याशिवाय विश्वचषकातील ४२ साखळी सामन्यांपैकी महत्त्वाच्या सामन्यांत तिस-या पंचाची व इंग्लंड-अफगाणिस्तान सामन्यावर मुख्य पंचांची भूमिका रवी बजावणार आहेत. तसेच विश्वचषकाच्या पाकिस्तान-यूएई., इंग्लंड-स्कॉटलंड या मुख्य स्पर्धेच्या साखळी सामन्यांवरही भारताचे एस. रवी मुख्य पंच म्हणून काम पाहणार आहेत.

जोहानचा समावेश
आयसीसीने विश्वचषकातील सामन्यासाठी पंचाची नावे जाहीर केली. या वेळी अायसीसी पंचाच्या अांतरराष्ट्रीय पॅनलच्या सदस्यांनाही सहभागी करण्यात अाले. यात जाेहान क्लाेत्से, क्रिस गाफाने, मायकल माॅ, रेनगाेर मार्तिनेज अाणि रुचिरा पी यांचीही यामध्ये निवड करण्यात अाली अाहे.