आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015: Today India Vs Pakistan Match At Adelaide

आज भारत-पाकिस्तान महालढतीवर अब्जावधी नजरा, अॅडलेडमध्ये रंगणार महामुकाबला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो )
अॅडलेड - आज घड्याळाचा तासकाटा नऊवर सरकताच अवघे क्रीडाविश्व रोमांचाने थरारून उठेल. रविवारी वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तानचे संघ एकमेकांना भिडतील. तब्बल १०० कोटी रसिक हा महामुकाबला लाइव्ह अनुभवणार आहेत. खुद्द आयसीसीनेच हे सांगितले आहे. महानायक अमिताभ बच्चन या सामन्याची कॉमेंट्री करणार आहे. वर्ल्डकपमध्ये पाकविरुद्ध विजयाचा ट्रॅक रेकॉर्ड कायम ठेवण्याच्या उद्देशाने टीम इंडिया मैदानात उतरेल. दबाव.. हाच या महामुकाबल्यातील सर्वात मोठा फॅक्टर असतो. प्रथमच दोन्ही देश स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात एकमेकांविरुद्ध झुंजतील. त्यामुळे रोमांच आणखी वाढला आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यात टीम इंडियाची पाटी कोरीच राहिलेली आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानी संघाने न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका गमावलेली आहे. यामुळे दोन्ही संघांची स्थिती जवळपास सारखीच आहे.

सकाळी नऊ वाजेपासून अॅडलेडमध्ये रंगणार महामुकाबला

पुढे वाचा...
धोनीचे बलस्थान : मैदानासह ड्रेसिंग रूममध्येही लय कायम ठेवता येते.
आव्हान : अंतिम ११ खेळाडू निवडण्याचे. यंदा एकाही गोलंदाजाला ५ बळी घेता आले नाहीत.
बिन्नीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
मिसबाहचे कच्चे दुवे : २००७ टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध मिसबाहच्या चुकीच्या फटक्यानेच पाक हरला.
आव्हान : संघनिवड. कारण उमर गुल, सईद अजमल व मोहंमद हाफिज हे आता संघात नाहीत.

दोन्ही संघांचा आजवरचा लेखाजोखा
> उभय संघांत १२६ सामने झालेत. वर्ल्डकपमधील ५ सामने भारताने जिंकले. शेवटची लढत २ मार्च २०१४ ला, भारत पराभूत झाला होता.
> अॅडलेडमध्ये भारताने एकूण ६ सामने खेळले आहेत. त्यापैकी ५ जिंकले. येथे भारत-पाकमध्ये एकमेव सामन्यात टीम इंडिया विजयी.

सलामीच्या दोन्ही लढती यजमानांनीच जिंकल्या
न्यूझीलंड ९८ धावांनी विजयी > न्यूझीलंड ३३२/९ विकेट > श्रीलंका : २३३/४६.१ षटके
ऑस्ट्रेलिया १११ धावांनी विजयी > ऑस्ट्रेलिया : ३४२/९ विकेट > इंग्लंड : २३१/४१.५ षटके