आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup, 7th Match, Pool A: Afghanistan V Bangladesh At Canberra

BAN vs AFG : बांगलादेशचा अ‍फगाणिस्‍तानवर 105 धावांनी दणदणीत विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनबेरा - विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज (बुधवार) बांगलादेश विरुद अफगाणिस्तान यांच्‍यादरमध्‍ये लढत होत आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे
(फोटो - अफगाणिस्‍तानचा शमिउल्‍लाह धावचित झाल्‍यानंतर )
प्रत्‍युत्‍तरादाखल अफगाणिस्‍तान संघाची सुरुवात अत्‍यंत खराब झाली आहे. 267 धावाचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघ 42.5 षटकातच सर्वबाद झाले. अफगाणिस्‍तानला 162 धावांपर्यंतच मजल मारला आली.
तत्‍पूर्वी बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 50 षटकात सर्वबाद 267 धावा केल्‍या आहेत.
अश्रफने टिपले दोन मोहरे
अफगाणिस्‍तानचा उंचपूर्ण गोलंदाज मिरवाईज अश्रफने बांगलादेशचे दोन मोहरे टिपले. बांगदेशचे सलामीवीर अनामूल हक आणि तमिम इक्‍बाल यांना बाद करत अफगाणिस्‍तानला आश्‍वासक सुरुवात करुन दिली.
तमीम परतला
बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज तमीम इक्‍बाल मिरनिवास अश्रफच्‍या गोलंदाजीवर ऑफ साइडचा फटका मारताना चूकला. अफसर झजाईने कोणतीही चूक न करता त्‍याचा झेल टिपला. तमीमने 42 चेंडूंचा सामना करताना दोन चौकाराच्‍या सहाय्याने 19 धावा केल्‍या.
अफगाणिस्तानचा संघ आज विश्वचषकातील अापल्या पहिल्या सामन्यात विजयी मंत्रासह मैदानावर उतरणार अाहे. बांगलादेशविरुद्ध सामन्यात अापली विजयी लय कायम ठेवण्यासाठी अफगाणिस्तान संघ उत्सुक अाहे. गतवर्षीच्या मार्च महिन्यातील अाशिया चषकात एका सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा ३२ धावांनी पराभव केला हाेता. दाेन्ही संघ अातापर्यंत एकाच लढतीत समाेरासमाेर अाले अाहेत.
बांगलादेश संघाने मागील अडीच महिन्यांपासून काेणताही अांतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला नाही. याची उणीव भरून काढण्यासाठी संघातील खेळाडू वर्ल्डकपच्या पहिल्या दिवसापर्यंत कसून सराव करताना दिसून अाले. अफगाणिस्तानचा संघ प्रथमच विश्वचषकात खेळत अाहे. दाेन्ही संघ स्वत: सक्षम असल्याचे सिद्ध करण्यासाठी मैदानावर उतरणार अाहे. बांगलादेशचा कर्णधार मुशर्रफ मुर्तझा सध्या दुखापतीने त्रस्त अाहे. त्यामुळे शाकीब-अल-हसन अाणि माेमिनूल हक यांच्यावर संघाची मदार असेल.
उभय संघ
बांगलादेश : अनामुल हक, तमीम इकबाल, सौम्य सरकार, महमुदुल्लाह, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), शब्बीर रहमान/नासिर हुसैन, मशरफे मुर्तजा (कर्णधार ), ताईजुल इस्लाम, तस्कीन अहमद, रुबेल हुसैन
अफगाणिस्तान : जावेद अहमदी, उस्मान गनी, असगर स्टानिकजई, नजीबुल्ला जादरान, समीउल्लाह शेनवारी, मोहम्मद नबी (कर्णधार )अफसर जजई (विकेटकीपर), गुलाबदीन नायब/मीरवाइज अश्रफ, दौलत जादरान, हामिद हसन, शपूर जादरान
पुढील स्‍लाइडवर छायाचित्रांमधून पाहा, सामन्‍यादरम्‍यानचा रोमांच