आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup: Australia, Africa Big Challenge Before India

भारतासमोर ऑस्ट्रेलिया, आफ्रिकेचे असेल आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : ऑस्ट्रेलिया संघातील सहकारी खेळाडूंबरोबर चर्चा करताना जॉन्सन.
अॅडिलेड- सध्याच्या विश्वचषकात भारतासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघ सर्वात मोठे आव्हान सिद्ध होऊ शकतात. आयसीसीने जे स्वरूप तयार केले, यात अव्वल आठ संघात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजचा नॉकआऊटमधील प्रवेश जवळजवळ निश्चित आहे.

मात्र, जिथपर्यंत विजेतेपदाची गोष्ट आहे, त्यात यजमान ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड प्रबळ दावेदारात सहभागी आहेत. फॉर्माच्या कारणाने हे तिन्ही संघ भारतीय संघाच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहेत. भारतीय संघाचा मार्ग सोपा नाही. गत विश्वचषकापासून भारतीय संघात मोठा बदल झाला आहे. सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली आहे. तसेच गत स्पर्धेतील विजयाचा शिल्पकार युवराजसिंगदेखील संघात नाही. भारताच्या फलंदाजीची मदार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि धोनीवर आहे.
ऑस्ट्रेलिया संघाकडे डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलच्या रूपाने असे फलंदाज आहेत, जे कोणत्याही गोलंदाजाच्या आक्रमणाला परतवू शकतात. तसेच या संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्व मिशेल जॉन्सनकडे असेल.

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डिव्हिलर्स जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने नुकत्याच विंडीजविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकले. त्याच्याशिवाय संघात हाशिम आमलासारखा स्टार फलंदाज आणि डेव्हिड मिलरसारखा फिनिशरदेखील आहे.