आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup: Australia Defeated England By 111 Runs

वर्ल्ड कप: फर्स्ट डे, सुपरहिट शो ! ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला १११ धावांनी हरवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: अकराव्या विश्वचषकातील पहिले शतक ठोकल्यानंतर कांगारूंच्या अॅरोन फिंचने असा जल्लोष केला.
मेलबर्न - अॅरोन फिंचच्या (१३५) शानदार शतकानंतर मिशेल मार्शने (५/३३) केलेल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडला १११ धावांनी पराभूत केले. अ गटातील दुस-या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या विशाल ३४३ धावांच्या प्रत्युत्तरात बलाढ्या समजल्या जाणा-या इंग्लंड संघाचा ४१.५ षटकांत अवघ्या २३१ धावांत खुर्दा उडाला.

फिंच-बेलीने सावरले
नाणेफेक हरल्याने प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियन टीमसाठी डेव्हिड वॉर्नर (२२) आणि अॅरोन फिंच (१३५) यांनी पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. पहिल्याच षटकात फिंचला जीवदान मिळाले होते. वॉटसन (०) भोपळाही न फोडता तंबूत परतला. संघाची धावसंख्या ७० असताना कर्णधार स्मिथ (५) झटपट बाद झाला. त्यानंतर फिंच आणि बेलीने संघाचा डाव सावरला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मार्शसोबत ५३ आणि हॅडिनसोबत तुफानी फटकेबाजी करत ६१ धावा जोडून मॅक्सवेलने (६६) संघाच्या धावसंख्येचा आलेख उंचावला.

फिनची हॅट्ट्रीक व्यर्थ
इंग्लंडकडून स्टीव्हन फिनने हॅट्ट्रीकसह पाच विकेट घेतल्या. मात्र, तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला. फिनने डावाच्या शेवटच्या षटकात शेवटच्या तीन चेंडूंवर हॅडिन, मॅक्सवेल आणि मिशेल जॉन्सनला (०) बाद केले. स्टुअर्ट ब्रॉडने दोन आणि ख्रिस वोग्सने एक गडी बाद केला. मात्र, वोग्स महागडा ठरला.

टेलरची झुंज अपयशी
प्रत्युत्तरात एक वेळ १ विकेटवर ४९ धावा काढणा-या इंग्लंड संघाला ९२ धावांसाठी ६ गडी गमावावे लागले. इंग्लंडसाठी जेम्स टेलरने सर्वाधिक ९८ धावा काढल्या आणि शेवटपर्यंत झुंज दिली. टेलरने वोग्ससोबत (३७) सातव्या गड्यासाठी ९२ धावांची भागीदारी केली होती. अँडरसन झटपट बाद झाला. अशा प्रकारे इंग्लंड संघाला सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियासाठी मार्शशिवाय जॉन्सन आणि स्टार्कने प्रत्येकी दोन गडी बाद केले. मार्शच्या ५ विकेटने सामना फिरवला.
पुढे वाचा, व्हिलन ऑफ द मॅच