आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्डकपमध्ये प्रकाशला कांस्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताचा खेळाडू प्रकाश नंजप्पाने शनिवारी दक्षिण कोरियातील आयएसएसएफ वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. त्याने पुरुष गटाच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात ही उल्लेखनीय कामगिरी केली. प्रकाशने 180.2 गुणांची कमाई करून पदकावर नाव कोरले.
त्याचे हे वर्ल्डकपमधील पहिले पदक ठरले. या गटात 2010 चा वर्ल्ड चॅम्पियन तोमोयुकी मस्तुदाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने 158.7 गुणांसह चौथे स्थान मिळवले. प्रकाशने 50 मीटर पिस्तूल प्रकारात आठवे स्थान पटकावले.