चेन्नई – विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी लॉन्च करण्यात आली आहे. त्याचा फर्स्ट लुक बीसीसीआयने
आपल्या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट केला. ट्वीटमध्ये एक फोटो असून त्यात कर्णधार
महेंद्रसिंह धोनी सर्वांत समोर उभा असून त्याच्या जर्सीवर स्टार इंडिया लिहिलेले आहे. भारत विश्वचषकातील पहिलाच सामना पाकिस्तानसोबत खेळणार आहे.
फोटोमध्ये धोनी समवेत रविंद्र जडेजा, सुरेश रैना, रोहित शर्मा ,
विराट कोहली, आर अश्विन ,शिखर धवन सारखे भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू आहेत. हा जर्सीसुध्दा पूर्वीच्या टी-शर्टप्रमाणेच निळ्या रंगाचा आहे.
स्टार इंडियाच्या पूर्वी सहारा हे भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजक होते. स्टार इंडियाला एक जानेवारी 2014 ते 31 मार्च 2017 पर्यंत संघाचे प्रायोजनपद देण्यात आले. यामध्ये बीसीसीआय, आयसीसी आणि एसीसीच्या स्पर्धांचाही सहभाग आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी दिली.
पाकचीही बदलली जर्सी
पाकिस्तान बोर्ड (पीबीसी) ने सुध्दा पाकिस्तान क्रिकेट संघाची जर्सी बदलली आहे. नवीन जर्सीसह शाहीद आफ्रिदीने एक फोटोही सोशल साइटवर पोस्ट केल आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, बीसीसीआयद्वारे केलेले ट्वीट..