आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषक: विजयासह इंग्लंड परतणार, पावसाचा व्यत्यय, अफगाणला ९ विकेटने हरवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: जेम्स टेलर आणि बेल
सिडनी - इंग्लंडने विश्वचषकातील आपल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचा डीएलनुसार ९ गड्यांनी पराभव केला. सामन्यात तीन वेळा पावसाच्या व्यत्ययामुळे अफगाणिस्तानला ३६.२ षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १११ धावा काढता आल्या. त्यानंतर २५ षटकांत मिळालेले १०१ धावांचे लक्ष्य इंग्लंडने एक गडी गमावून गाठले. इंग्लंडचा सहा सामन्यांत हा दुसरा विजय ठरला. या ४ गुणांसह इंग्लंड संघ पाचव्या स्थानावर राहून स्पर्धेतून बाहेर झाला आहे. अफगाणिस्तानने आपल्या पहिल्या विश्वचषकातील एका विजयासह दोन गुणांची कमाई केली आणि ब गटात सहावे स्थान गाठले. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.