आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फीफा विश्वचषकाचा असाही फॅशन फीवर, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझीलमध्ये होत असलेल्‍या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फुटबॉल वर्ल्ड कपचा जसजसा सामना रंगत आहे. तसतसा फुटबॉलचा फिवर लहान मुलांपासून यंगस्टरपर्यंत सर्वांवर पहायला मिळत आहे. कट्ट्यावर फुटबॉलचीच चर्चा आहे. आपल्या आवडत्या खेळाडूने स्पर्धेत जास्त गोल करावेत अशी इच्छा प्रत्येक फुटबॉल चाहत्याची असते.
ज्‍या देशातील संघ या विश्व चषकासाठी स्‍पर्धेत उतरलेले आहेत. त्‍या प्रत्‍येकाला वाटते की यावेळी विश्व चषकाचा कप आपल्‍या देशाला मिळावा. यासाठी आपल्‍या चेह-याला वर्ल्‍ड कपचा आकार देणारे चहाते कमी नाहीत. काही चाहत्‍यांनी कलेचे काही अफलातून प्रकार केले आहेत.
युवकांमध्ये अर्जेंटिनाचा स्ट्रायकर लियोनल मेस्सी व पोर्तुगालचा क्रिस्तियानो रोनाल्डो जास्त फेव्हरेट आहेत. तसेच यांच्या व्यतिरिक्त ब्राझीलचा युवा खेळाडू नेमार, काका स्पेनचा फर्नांडो टोरेस, डेव्ह‌िड व्हिला, इंग्लंडचा वेन रुनी यांना देखील चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. तसेच यावेळी वर्ल्ड कप जिंकण्याचा स्पर्धेत स्पेन व ब्राझील असतील, असे बहुतेक युवकांचे मत आहे. यासाठी युवकांनी आपल्‍या चेह-यालाच वर्ल्‍ड कपचा आकार दिला आहे.
छायाचित्रे पाहा पुढील स्‍लाईडवर...