आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup Hockey Tournament: India Beat South Africa

विश्वचषक हॉकी स्पर्धा :सराव सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेग - हॉकी विश्वचषकाला प्रारंभ होण्यापूर्वीच्या अखेरच्या सराव सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा 4-1 असा पराभव केला. त्यामुळे निदान प्रत्यक्ष विश्वचषकापूर्वी तरी भारतीय संघात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

याआधीच्या सराव सामन्यात भारताला अर्जेंटिनाकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धचा विजय हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या सामन्यात भारताने बहुतांश वेळ सामन्यावर वर्चस्व राखले. त्यात पूर्वार्धाच्या समाप्तीवेळी मिळालेल्या पेनॉल्टी कॉर्नरवर भारताकडून रूपिंदरसिंगने पहिला गोल लगावत भारताला आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात पुन्हा मिळालेल्या पेनॉल्टी कॉर्नरवर रूपिंदरने पुन्हा एकदा गोल लगावत भारताची आघाडी वाढवली. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने एक गोल करत ही दरी कमी केली. मात्र, त्यानंतर सरदारसिंग आणि रघुनाथने केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर भारताने 4-1 ने सामना आरामात जिंकला.
युवराज वाल्मीकी फॉर्मात
संघात ऐनवेळी समावेश करण्यात आलेले ललित उपाध्याय आणि युवराज वाल्मीकी हे दोन्ही खेळाडू पहिल्या सामन्यापासूनच चांगल्या फॉर्ममध्ये खेळत असल्याने आनंद झाल्याचे हाय परफॉर्मन्स संचालक रोलिएंट ओल्टमन्स यांनी सांगितले. पूर्वार्धात खेळ थोडा हळू झाला असला तरी उत्तरार्धात खेळाडूंना लय गवसल्याने खेळाचा आणि गोलचा वेग वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.