आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्डकपसाठी ब्राझील सज्ज; 28 अब्ज डॉलर्सची कमाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साओपावलो - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळाल्याने आनंदात असलेल्या ब्राझील सरकारच्या आनंदात आणखी भर पडली आहे. कारण या स्पर्धेमुळे ब्राझीलला चांगले वैभवच प्राप्त होईल असे नव्हे, तर यातून सुमारे 28 अब्ज डॉलर्सचे उत्पन्नही होणार आहे. ब्राझीलच्या पर्यटन मंत्रालयाने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. येत्या 12 जून ते 13 जुलैदरम्यान 12 शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. मंत्रालयाच्या अनुमानानुसार मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या कॉन्फेडरेशन चषकातून ब्राझीलला 9.2 अब्ज डॉलर्सचे उत्पन्न झाले होते. त्यापैकी 4.9 अब्ज डॉलर्स हे पर्यटकांकडून, तर उर्वरित 4.32 अब्ज डॉलर्सची रक्कम सामान आणि सर्व्हिसच्या माध्यमातून प्राप्त झाली होती. याला गृहीत धरून नॅशनल बिझनेस कॉन्फेडरेशन ऑफ गुड्स, सर्व्हिसेस आणि टुरिझमने या वर्षी होणार्‍या विश्वचषकादरम्यान पर्यटन क्षेत्रात सुमारे 47 हजार 900 लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगितले आहे.
5 सामने खेळवले जाणार
50 हजार प्रेक्षक बसू शकतील
1969 मध्ये स्टेडियम बांधले गेले
12 जून ते 14 जुलै दरम्यान होणार स्पर्धा