आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटनेस टेस्टमध्‍ये ईशांत 'फेल' विश्‍वचषका‍तून बाहेर, मोहितला मिळू शकते संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड-विश्‍वचषकापूर्वी टीम इंडियाला झटका बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा फिटनेस टेस्‍टमध्‍ये पात्र ठरु शकला नाही. त्‍यामुळे त्‍याला विश्‍वचषकात खेळण्‍याची संधी गमवावी लागली आहे.
ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर गेलेल्‍या भारतीय संघातील वेगवान गोलंदाज भुवनेश्वार कुमार, इशांत शर्मा, रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा दुखापतग्रस्‍त होते. शनिवारी झालेल्‍या चाचणीमध्‍ये इशांत शर्मा टेस्‍टमध्‍ये फेल झाला आहे.
मी फिट असून ऑस्ट्रेलिया विरुध्‍द खेळेन
रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्‍ये पास झाला आहे. हॅमस्ट्रिंग दुखापतीतून बरा झालेला रोहित शर्मा ऑस्‍ट्रेलियासोबत असलेल्‍या सराव सामन्‍यातही खेळणार आहे. 'तीन आठवडे चांगला आराम करुन आणि मेडिकल स्‍टाफच्‍या मार्गदर्शनाने आपण या दुखापतीतून सावरलो,' असल्‍याचे रोहित शर्माने सांगितले आहे.