आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup Kabbadi Competation : England, Canda Won

विश्वचषक कबड्डी स्पर्धा : इंग्लंड, कॅनडाचा शानदार विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरणतारण - चौथ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या दुस-या दिवशी इंग्लंड, कॅनडा आणि डेन्मार्कच्या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्याला हरवत पुढील फेरीत प्रवेश केला आहे.गुरू अर्जुनदेव मैदानावर सोमवारी इंग्लंड आणि सिएरा लियोन यांच्यादरम्यान पुरुष गटाचा सामना खेळवला गेला. इंग्लंडच्या खेळाडूंनी शानदार चढाई आणि उत्कृष्ट पकडीच्या भरवशावर सिएरा लियोनला शेवटपर्यंत वरचढ होऊ दिले नाही. इंग्लंडने ही लढत 41-34 अंकांनी जिंकली. पुरुष गटातील दुस-या सामन्यात कॅनडाने डेन्मार्क वर सहज विजय मिळवला. कॅनडाने हा सामना 89-9 अंकांसह जिंकला, तर अन्य एका लढतीत पाकिस्तानच्या संघाने स्कॉटलंडचा 63-26 ने पराभव केला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर गुज्जरने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
पाक महिलांचा पराभव
विश्वचषक कबड्डी स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या अननुभवी पाकिस्तान महिला संघाला डेन्मार्कने हरवले. रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या नवख्या खेळाडूंना बरेचदा अंक मिळवण्याची संधी मिळाली, परंतु त्यांना या संधीचे सोने करता आले नाही. याउलट डेन्मार्कच्या खेळाडूंनी मात्र पाकिस्तानची प्रत्येक चूक हेरली आणि 45-39 ने विजय मिळवला. पाकिस्तानच्या महिला संघाने मात्र यावेळी प्रेक्षकांची मने जिंकली.
आजचे सामने
भारत विरुद्ध केनिया (महिला)
भारत विरुद्ध स्पेन (पुरुष)
अमेरिका विरुद्ध केनिया (पुरुष)