आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Cup OMG FACTS: Lasith Malinga Take Two Hat Tricks In World Cup

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WC OMG! मलिंगाच्‍या नावे वर्ल्‍ड रेकॉर्ड, पहिली हॅट्रिक भारतीय गोलंदाजाच्‍या नावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आतापर्यंतच्‍या विश्‍वचषकात सर्वांधीक दोन हॅट्रिक श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज ‘यार्कर किंग’ लसिथ मलिंगाच्‍या नावे आहेत. असा विक्रम आजपर्यंत कोणीच करु शकले नाही. 2015 च्‍या विश्‍वचषकात स्‍वत:चाच विक्रम मोडण्‍याची संधी मलिंगाला आहे. विश्‍वचषकात हॅट्रिक साधण्‍याची किमया सर्वप्रथम भारतीय खेळाडूच्‍या नावे आहे. भारताच्‍या चेतन शर्माने 1987 मध्‍ये हॅट्रिक साधली होती.
Divyamarathi.com आपणास WC OMG या मालिकेअंतर्गत विश्‍वचषकातील आतापर्यंत झालेल्‍या हॅट्रिक विषयी सांगणार आहे.
आतापर्यंत सात हॅट्रिक
विश्‍वचषकाच्‍या इतिहासामध्‍ये आतापर्यंत केवळ सात वेळा हॅट्रिक नोंदवल्‍या गेली आहे. त्‍यामध्‍ये दोन हॅट्रिकचा विक्रम यार्करकिंग मलिंगाच्‍या नावे आहे. शिवाय भारताचा चेतन शर्मा, पाकिस्‍तानचा सकलैन मुस्ताक, श्रीलंकेचा चमिंडा वास, ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली आणि वेस्ट इंडीजचा केमर रोचने प्रत्‍येकी एक-एक वेळा हॅट्रिक साधली आहे.
28 मार्च, 2007 रोजी गुयानामधील स्टेडियममध्‍ये श्रीलंकाने 49.3 षटकात 209 धावा केल्‍या होत्‍या. प्रतिउत्‍तरदाखल दक्षिण आफ्रिकेने 45.4 षटकात 206 धावा केल्‍या. त्‍यांना जिंकण्‍यासाठी 32 चेंडूत 4 धावांची आवश्‍यकता असताना आणि पाच विकेट शेष असताना मलिंगोन चार चेंडूत चार फलंदाज बाद केले होते. भलेही दक्षिण आफ्रिका हा सामना जिंकली होती.
शॉन पोलॉक, एंड्र्यु हॉल, जॅक कॅलिस, मखाया एंटीनी या चौघांना मलिगाने लागोपाठ बाद केले होते.
लसिथ मलिंगाची दुसरी हॅट्रिक
देश
श्रीलंका
विरुध्‍द
केन्या
आउट फलंदाज
तन्मय मिश्रा, पीटर ओगोंडो, शेम नेगोचे
सामन्‍यातील प्रदर्शन
6/38
केव्‍हा
2011
पुढील स्‍लाइडवर वाचा, विश्‍वचषक इतिहासातील पहिली हॅट्रिक भारतीय खेळाडूच्‍या नावे