आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकच विश्वचषक खेळून ठरले हीरो, दुस-या स्पर्धेला मुकलेपीटर कर्स्टन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्वचषक जिंकून हीराे हाेणा-या क्रिकेटपटूंचे अनेक किस्से अाहे. मात्र, असे काही माेजकेच स्टार अाहेत, ज्यांनी एकच विश्वचषक खेळला व यातील उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर त्यांनी अापली नवीन अाेळख निर्माण केली. अशा पाच खेळाडूंच्या कामगिरीचा लेखाजाेखा.
दक्षिण अाफ्रिका
1992 विश्वचषकात 37 वर्षीय कर्स्टनने 66.65 च्या सरासरीने 410 धावा काढल्या. यात चार अर्धशतके अाहेत. स्पर्धेत सर्वाधिक धावा मार्टिन क्रो (456) व जावेद मियादाद (437) यांनी काढल्या. अाफ्रिका संघाचा हा पहिला विश्वचषक हाेता.
नील जॉन्सन झिम्बाव्वे
अष्टपैलू. 1999 विश्वचषकात 1 शतक, 3 अर्धशतकांच्या अाधारे 367 धावा काढल्या. 12 बळी घेतले. तीन वेळा सामनावीर. 2000 मध्ये झिम्बाव्वे साेडून दक्षिण अाफ्रिकेत राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे दाेन वर्षांचे अांतरराष्ट्रीय करिअर 2000 मध्ये संपुष्टात अाले.

ए. बिशेल ऑस्ट्रेलिया
या वेगवान गाेलंदाजाने 2003 च्या विश्वचषकात 12.3 च्या सरासरीने 16 विकेट घेतल्या. बेवनसाेबत दाेन सामन्यांत अनुक्रमे अाठव्या व 10व्या गड्यासाठी नाबाद 73 व 97 धावांची भागीदारी केली. मात्र, 2004 मध्ये करार संपुष्टात अाल्याने करिअर संपले.
गॅरी गिलमोर ऑस्ट्रेलिया
1975 वर्ल्डकपमध्ये ग्रुप सामन्याला मुकला. उपांत्य लढतीत इंग्लंडविरुद्ध सहा व विंडीजविरुद्ध फायनलमध्ये पाच बळी घेतले. मात्र, विश्वचषकानंतर त्याला एकच वनडे खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर ताे कसाेटी क्रिकेट खेळत राहिला.