आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगारंग कार्यक्रमात वर्ल्डकपला सुरुवात, सामने उद्यापासून रंगणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: धोनी फेव्हरेट विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी चाहत्यांचा फेव्हरेंट असल्याचे दिसून आले. मेलबर्न येथील कार्यक्रमात चाहत्यांनी त्याला असे घेरले.
ख्रइस्टचर्च/मेलबर्न- न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ फेब्रुवारीपासून सुरू होणा-या अकराव्या क्रिकेट वर्ल्डकपचा गुरुवारी रंगारंग कार्यक्रमात उद्घाटन सोहळा पार पडला. १४ संघांदरम्यान जवळपास ४४ दिवस चालणा-या या वर्ल्डकपचा उद्घाटन सोहळा न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्चच्या हेग्ले पार्क आणि मेलर्बनच्या मायर म्युझिक बाऊल येथे जवळपास तीन तास रंगला. फेब्रुवारी २०११ मध्ये भूकंपात ख्राइस्टचर्चचे नुकसान झाल्यानंतर न्यूझीलंडमध्ये ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. वर्ल्डकपचा उद्घाटन सामना शनिवारी ख्राइस्टचर्च येथे यजमान न्यूझीलंड आणि गतउपविजेता श्रीलंका यांच्यात होईल. याच दिवशी मेलबर्न येथे चार वेळेसचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंड यांच्यात सामना रंगेल. न्यूझीलंडचा सोहळा त्यांचे लोकनृत्य आणि संगीतावर आधारित होता. या वेळी पंतप्रधान जॉन की यांनी वर्ल्डकप क्रिकेटच्या अधिकृत उद्घाटनाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियातील सोहळ्यादरम्यान काही संघांना वगळता उर्वरित सर्व संघांचे कर्णधार परेड करताना व्यासपीठावर पोहोचले.

भारताच्या 'धतिंग-धतिंग'चा डंका
या रंगारंग सोहळ्यात भारतीय कलाकारांनी आकर्षक प्रस्तुती सादर केली. त्यांच्या 'धतिंग-धतिंग' डान्सच्या सादरीकरणाचा प्रेक्षकांनी जोरदार आनंद लुटला. भारतातील झुम ग्रुपने 'फटा पोस्टर, निकाला हीरो'तील गाणे "धतिंग'वर नृत्य करून चाहत्यांना बांधून ठेवले.
पुढे वाचा,