आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup Warm up Match: India Vs Australia In Adelaide

विश्वचषक : भारत-ऑस्ट्रेलिया सराव सामना आज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अ‍ॅडिलेड - विश्वचषकात सहभागी झालेल्या सर्व संघांना आपापली तयारी तपासण्याची वेळ आली आहे. पहिल्या दिवशी सराव सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत समोरासमोर असतील. आपल्या खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेस तपासण्याची टीम इंडियासाठी ही सुवर्णसंधी आहे. या लढतीत ऑस्ट्रेलिया आपल्या युवा खेळाडूंना संधी देऊ शकतो.

भारतीय संघाला तिरंगी मालिकेत एकही सामना जिंकता आला नव्हता. मात्र, आता ती जुनी गोष्ट ठरली आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध सराव लढतीत टीम इंडिया आपल्या सर्व खेळाडूंना तपासू शकते.

अफगाणिस्तानसोबत भारताचा सराव सामना १० फेब्रुवारी रोजी आहे. ही लढत शिखर धवन, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि भुवनेश्ववर कुमार यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. कारण, या लढतीद्वारे भारतीय संघातील या खेळाडूंना आपला फाॅर्म आणि फिटनेस दोन्ही तपासता येतील.

टीम इंडिया या सामन्यात अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीला संधी देऊ शकते. अशा स्थितीत अक्षर पटेलला संघाबाहेर बसावे लागेल. अंतिम अकरा खेळाडूंत आर. अश्विनच्या रूपाने एकमेव फिरकीपटू असू शकतो. ऑस्ट्रेलिया संघाकडून या सामन्यात नियमित कर्णधार मायकेल क्लार्क खेळू शकतो.

ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅरोन फिंच, शेन वॉटसन, स्टिवन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जॉर्ज बेली, ब्रेड हॅडिन, मिशेल स्टार्क, मिशेल जॉन्सन, जोश हेझलवूड, झेव्हियर डोहर्ती, मिशेल मार्श.

भारत : महेंद्रसिंग धाेनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, मोहित शर्मा, मो. शमी.